Thu, Jan 15, 2026
स्थानिक बातम्या

वाई वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.सुनील वाडकर व उपाध्यक्ष पदी ॲड.प्रशांत खरे यांची निवड

वाई वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.सुनील वाडकर व उपाध्यक्ष पदी ॲड.प्रशांत खरे यांची निवड
Ashok Ithape
  • PublishedMarch 16, 2025

पाचवड l प्रतिनिधी : वाई येथील वाई वकील संघाच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. सुनील वाडकर तर उपाध्यक्षपदी ॲड. प्रशांत खरे यांची बिनविरोध निवड झाली.

वाई वकील संघाची २०२५- २६ साठीची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. सुनील वाडकर हे निवडून आले. तसेच उपाध्याक्षपदी ॲड. प्रशांत खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सचिवपदी ॲड . सुमित सणस, सहसचिवपदी ॲड. अस्मिता झेंडे व खजिनदारपदी ॲड . विठ्ठल कदम, कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. शिवदत्त दाहोत्रे, ॲड.सौरभ आगेडकर, ॲड.अविनाश गजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून ॲड. पुजा ननावरे व ॲड. अलीशा सय्यद या महिला सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. साहेबराव बामणे व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अमित देशमाने यांनी काम पाहिले.

यावेळी ॲड. सुनील वाडकर यांनी वाई वकील संघाच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले तसेच लोक न्यायालय , विधी सेवा समितीमार्फत पक्षकारांना मोफत सल्ला व वकील देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . तसेच उपाध्यक्ष ॲड. प्रशांत खरे यांनी सर्व नवनिर्वाचित कार्यकारणीच्या वतीने ॲड. सुनील वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शनाने वाई वकील संघास साजेसे काम करण्याचा शब्द दिला व निवडीबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे वाई वकील संघातील सर्व सीनियर व ज्युनियर वकील तसेच महिला वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!