Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

बावधन बगाड यात्रा २०२५ बगाड्या होण्याचा मान अजित बळवंत ननावरे यांना

बावधन बगाड यात्रा २०२५ बगाड्या होण्याचा मान अजित बळवंत ननावरे यांना
Ashok Ithape
  • PublishedMarch 14, 2025

काशिनाथाचं चांगभलं…

बावधन l प्रतिनिधी : बावधन बगाड यात्रा सुरू झाली असून 2025 यंदाचा बगाड्या होण्याचा बहुमान बावधन येथील अजित बळवंत ननावरे वय 39 व्यवसाय होमगार्ड यांना मिळाला आहे. यावर्षी श्री काळभैरवनाथ मंदिरात होळी पौर्णिमे दिवशी नवस फेडण्यासाठी 44 नवस करी बसले होते त्यात दहावा नंबर अजित ननावरे यांचा होता. नाथाने त्यांच्या नावाचा उजवा कौल दिल्याने 2025 यंदाचा बगाड घेण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

बगाड्या अजित ननावरे यांनी 2014 ला आपला भाऊ सुनील याचा विवाह योग जुळून यावा यासाठी श्री काळभैरवनाथ चरणी नवस केला होता, भाऊ सुनील याचे लग्न झाले त्यावेळीच बोललेला नवस पूर्ण झाला होता. 2025 यंदा पहिल्यांदाच अजित हे नवस फेडण्यासाठी बसले नाथाने त्यांच्यावर कृपा वृष्टी दाखवली, पहिल्या झटक्यातच बगाड्या होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला बावधन मधील बळवंत श्रीपती ननावरे व त्यांच्या पत्नी रत्‍नाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी फार मोठा संघर्ष केला, ठिकठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारात कडधान्य विक्रीचा गेले चाळीस वर्षे व्यावसाय करून कुटुंबाचा गाडा चालवला.

त्यांना तीन मुलगे अनिल, सुनील आणि अजित ननावरे ह्या कुटुंबाची काळभैरवनाथावर अपार श्रद्धा व भक्ती आहे बगाड्या अजित यांनी मोठ्या भावाच्या कल्याणासाठी नाथा तुझं बगाड घेईन असा नवस केला ही आपल्या कुटुंबावर असणारे प्रेम माया औदार्य जीव मनापासून ची सद्भावना सर्वकाही पहावयास मिळते.

यावर्षी मंगळवार दिनांक 18 रोजी श्रीनाथाचा छबिना बुधवार दिनांक 19 रोजी रंगपंचमी दिवशी बगाड होईल व गुरुवार दिनांक 20 रोजी भाविकांच्या करमणुकीसाठी सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा व दुपारी जंगी कुस्त्यांचा फड असा भरगच्च बगाड यात्रा कार्यक्रम संपन्न होणार.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!