Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

माजी सैनिकांच्या जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख विभागाशी सबंधीत समस्या सोडविण्यासाठी 19 मार्च रोजी बैठक

माजी सैनिकांच्या जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख विभागाशी सबंधीत समस्या सोडविण्यासाठी 19 मार्च रोजी बैठक
Ashok Ithape
  • PublishedMarch 13, 2025

सातारा दि. 13: जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, सातारा यांचे अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिकांचे भूमि अभिलेख विभागा संबंधित समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी १९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, सर्व्हे नं. २८३/१अ, फ्लॅट नं. १, राधिका रोड, करंजे तर्फ सातारा येथील सातारा सिटी बिझनेस सेंटर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 आजी, माजी सैनिकांनी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख विभागाकडे काही समस्या, प्रश्न असल्यास त्याबाबतच्या पुराव्याच्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडू करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!