Mon, Mar 2, 2026
आरोग्य सामाजिक

रोटरी क्लब ऑफ वाईकडून गरजू अपंग व्यक्तींसाठी कृत्रिम पाय आणि हात शिबिराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ वाईकडून गरजू अपंग व्यक्तींसाठी कृत्रिम पाय आणि हात शिबिराचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedMarch 12, 2025

अपघात वा इतर कारणांमुळे हात, पाय जावून अपंगत्व आलेल्या दिव्यांगांना या शिबिराचा लाभ घेता येईल.

वाई : हात आणि पाय नसलेल्या अपंग व्यक्तींना आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले कृत्रिम पाय आणि हात मोफत बसविण्यासाठी मोजमाप शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वाई आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सामाजिक सेवेत अग्रेसर असणाऱा रोटरी क्लब ऑफ वाई गेली 22 वर्षे सातत्याने अशा शिबिराचे आयोजन करत आहे. आतापर्यंत हजारो दिव्यांगांनी याचा लाभ घेतला आहे.

अपघात वा इतर कारणांमुळे हात, पाय जावून अपंगत्व आलेल्या दिव्यांगांना या शिबिराचा लाभ घेता येईल. ज्या दिव्यांगांचा गुडघ्यावरील पाय नाही तसेच कोपरापुढील हात नाही अशांसाठी हे शिबिर असणार आहे. हे शिबिर दि. 20 मार्च 2025 रोजी डॉ. मिरजकर हॉस्पिटल, भगवा कट्ट्याजवळ, मधली आळी वाई येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वाईचे अध्यक्ष डॉ. मनोहर दातार यांनी दिली.

तरी गरजू दिव्यांगांनी डॉ. मिरजकर हॉस्पिटलच्या 9145220665, 9146220665 या क्रमांकावर रांपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!