Mon, Mar 2, 2026
सामाजिक

वाहक अमित सुपल व कु. आर्या गुरव या विद्यार्थीनीच्या प्रामाणिकपणा बद्दल सत्कार

वाहक अमित सुपल व कु. आर्या गुरव या विद्यार्थीनीच्या प्रामाणिकपणा बद्दल सत्कार
Ashok Ithape
  • PublishedMarch 10, 2025

खंडाळा l प्रतिनिधी : वाटद खंडाळा येथील श्री गोविंद भडसावळे यांचे रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासात पैशाचे पाकीट व अनेक महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट नुकतेच बसमध्ये हरवले होते. ते पाकीट वरवडे येथील विद्यार्थीनी आर्या प्रविण गुरव हिला सापडले. ते तिने वाहक अमित सुपल यांना दिले.सदर पाकीट खंडाळा बसस्थानकात त्यांनी जमा केले. या दोघांच्या प्रामाणिक पणाबद्दल खंडाळा ग्रामस्थांनी या दोघांचा शाल, श्रीफळ, बुके व मिठाई देवून सत्कार केला.

यावेळी वाटद खंडाळ्याचे सरपंच अमित वाडकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळशेठ जोग, पत्रकार विलासराव कोळेकर, उदय महाकाळ व सुनिल वनये, तसेच चालक आर. एम. सनदी, चालक किशोर जाधव, वाहतूक नियंत्रक आर. डी. चव्हाण, शेखर भडसावळे, प्रसाद पेढे, प्रकाश नाचरे, प्रविण मेस्त्री, रामदास खेडेकर, अजय मोघे, शरद महाडिक, अर्जुन कामत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बाळशेठ जोग यांनी वाटद खंडाळा येथील वाहतूक नियंत्रक आर. डी. चव्हाण यांची प्रवाशांना मिळत असलेली उत्तम सेवा पाहता त्यांना किमान दोन वर्षे सेवेची मुदत वाढ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच अशा प्रामाणिक कर्मचारी व विद्यार्थीनीचे विशेष कौतुक केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!