वाईत रविवारी ३५ वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन
![]()
उद्घाटन, प्रकट मुलाखत, कवी संमेलन आणि कथाकथन असे होणार विविध कार्यक्रम.
वाई, दि. ५ :- दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि कलासागर ॲकॅडमी, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने
येत्या रविवारी ( ता. ९) ‘ ३५ वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन ‘ वाईत होत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची संमेलनाध्यक्षपदी आणि कलासागर ॲकॅडमीचे प्रा. लहुराज पांढरे यांची स्वागताध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे. वाई येथे पहिल्यांदाच दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन होत आहे. शहाबाग येथील ‘ सावकार लॉन्स ‘ या ठिकाणी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरीत हे संमेलन होणार आहे. रविवारी (ता.९) सकाळी दहा वाजता सदानंद देशमुख (बुलढाणा ) यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, रविंद्र बेडकिहाळ तर ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी,
शहाबागचे सरपंच सागर जमदाडे, उपसरपंच किरणकुमार जमदाडे, दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन कदम किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, कोरेगावचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, मराठी विश्वकोश मधील विद्याव्यासंगी रविंद्र घोडराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, दिनकर झिंब्रे, ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.पंडित टापरे, आणि ज्येष्ठ लेखिका प्रा.डॉ. रामकली पावसकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या संमेलनात दुपारी बारा वाजता लेखक पटकथाकार अरविंद जगताप यांची सरोजकुमार मिठारी व डॉ.दत्ता जगताप हे प्रकट मुलाखत घेणार आहेत. दुपारी दोन वाजता ‘ कविसंमेलन ‘ होणार असून यामध्ये डॉ.कविता मुरूमकर (सोलापूर),
डॉ.चंद्रकांत पोतदार (चंदगड), विलास माळी (गडहिंग्लज), अजय कांडर (कणकवली), रमजान मुल्ला (नागठाणे), ज्ञानेश सूर्यवंशी (पाचगणी),रवी बावडेकर ( इस्लामपूर ), लक्ष्मीकांत रांजणे, योगिता राजकर, सुस्मिता खुटाळे (तिघे ही वाई), वसंत शिंदे, डॉ.सुभाष वाघमारे, डॉ.राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, चंद्रकांत कांबिरे, डॉ.आदिती काळमेख, कांता भोसले, मनीष शिरतवडे आदी कवींचा सहभाग आहे. दुपारी चार वाजता किसन वीर महाविद्यालयाचे उपरचार्य
प्रा.डॉ.चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ कथा कथन ‘ होणार असून यामध्ये हिंमत पाटील (नागठाणे ), जोतीराम फडतरे (वाटंबरे) व डॉ.अर्जुन व्हटकर (सोलापूर) यांचा सहभाग आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांना साहित्यप्रेमी व वाईकर रसिकांनी उपस्थित राहून संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुमुळू, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे व अरुण आदलिंगे यांनी केले आहे.













