Thu, Jan 15, 2026
अध्यात्म

‘श्री चवणेश्वराच्या चांगभलं’ने दसवडी यात्रा उत्साहात संपन्न

‘श्री चवणेश्वराच्या चांगभलं’ने दसवडी यात्रा उत्साहात संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMarch 5, 2025

गावपांढरीच्या ओढीने आलेल्या चाकरमानी, ग्रामस्थ व माहेरवासीणीची मोठी गर्दी..

वाई तालुक्यातील दसवडी गावातील अबालवृद्ध पुरुष महिला आणि लहान मुले, माहेरवासीनी यांच्या प्रचंड उत्साहात वृज्ज लेप आणि जीर्णोद्धार सोहळा अत्यंत भक्तिमय व आनंददायक वातावरणात संपन्न झाला. दिनांक 27 व 28 फेब्रुवारी व 01 मार्च असा सोहळा व श्री चौवनेश्वर देवाची यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. सर्व पुरुष यांनी सफेद कपडे परिधान केले होते. सर्व महिलांनी लाल साडी पारंपारिक पद्धतीने परिधान केल्या होत्या एक वेगळाच भक्तीमय सोहळा निर्मिती झाली होती. माहेरवाशींनीनि सुद्धा लाल साड्या परिधान केले होत्या.

प्रथम दिवस 27 फेब्रुवारी श्री चौवनेश्वर देवाची भव्य मिरवणूक दसवडी ते चिखली संपन्न होत होती. सकाळी सात वाजल्यापासून तयारी चालली होती.श्री चौनेश्वराच्या कमानीवर गणेश मूर्तीचे विधीपूर्वक पंडितांनी स्थापना केली. रथ, बैलगाड्या,अश्व यांच्या मधून मिरवणूक निघणार होती.विधीपूर्वक सर्व ग्रामदैवताच्या मूर्ती रथावर व बैलगाडी मध्ये गादीवर बसवण्यात आल्या. भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात होत होती.पंडित जी पोराहित्य विधीपूर्वक करून मिरवणूक निघणार होती. चौणेश्वराचे भक्त या मिरवणुकीमध्ये भाग घेत होते.मिरवणुकीची सुरुवात श्री चौनेश्वराच्या मंदिरापासून करण्यात आली.

सकाळी 11 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली.सूर्यदेव एवढे तळपत होते. परंतु भक्त जणांना कुठेही थकवा जाणवला नाही.काही भक्त जन पायामध्ये कोणत्याही प्रकारचे वाहन नव्हते, तरीसुद्धा श्री चौणेश्वर भक्तांना कसलीही बाधा झाली नाही. लहान मुले सुद्धा डांबर रस्त्यावरून चालत होते. चौवनेश्वराची एवढी मोठी कृपा होती भक्तांना एक प्रकारचा आशीर्वादच दिला होता. त्यामुळे सर्वजण आनंदी व भक्तिमय लीन झाले होते. प्रथम फटाक्यांची आतिश बाजी झाली.मुख्य रथा पुढे श्री चौनेश्वराची पालखी व अश्व होते.अश्वापुढे वाजंत्री, ढोल,झांज व तुतारी वाजत गाजत मिरवणूक निघाली होती. चौवनेश्वर नावाचं चांगभलं असं संपूर्ण परिसर दुमदुमला. महिलावर्ग देवाची गाणी गात होती. गावापासून मारगाव, पिंपळवाडी, वाडकरवाडी मध्ये मिरवणूक पोहोचली. चौणेश्वराची बहीण पारजाईचे दर्शन घेऊन चिखलीकडे प्रस्थान झाले. चिखलीचे ग्रामदैवत श्री चवनेश्वर हे दसवडीच्या चौणेश्वराचे मोठे बंधू. दसवडी गावचे श्री चौवनेश्वर दैवत काही दिवसासाठी मोठ्या भावाकडे पाहुणे म्हणून गेले होते. त्याचा विधिपूर्वक चिखलीच्या चौणेश्वर मंदिरात पंडितजी व पुजारी यांनी देवाचा कार्यक्रम करण्यातआला.

जवळ जवळ दीड तास हा भक्तिमय कार्यक्रम चालला होता. तेथून वाजत गाजत दसवडीकडे श्री चौनेश्वराची मिरवणूक निघत होती. चिखली मध्ये श्री चौनेश्वराच्या मंदिरात समोर ढोलांचा जणू काय छबिना चालला होता. महिला पारंपारिक पद्धतीने देवाच्या गाण्यावर ठेका धरला होता.काही महिला फुगडी खेळत होत्या. परमेश्वर जणू काय स्वर्गातून पुष्पवृष्टी करत होते.या भक्तीमय सोहळ्यामध्ये सर्वजण मोठ्या मनाने भाग घेत होते.आपला देव परत आपल्या मंदिरी आणायचं होता. सर्वजण गुलालामध्ये नाऊन गेले होते. वाजत गाजत मिरवणूक चिखली गावातून मुगावकडे निघाली होती.

चिखली फाट्यावरती बऱ्याच वेळ पालखी व ढोल यांचा गजर होतो होता. सर्व ठिकाणी मूर्तींचे भक्तीभावाने पूजन पाहुण्या महिलांनी केले. चौणेश्वराचं चांगभले हा आवाज दुमदुमत होता. फटाके वाजवले जात होते. श्री चौवनेश्वर हे जागृत देवस्थान महादेवाचे रूप आहे. हे दैवत महादेव, केदारनाथ, स्वयंभू भोळा शंकर यांचे प्राकृतिक रूप आहे.अत्यंत कडक शाशन अशी श्री चौनेश्वराची ख्याती आहे.या चौणेश्वराची परोपकारी पांढरीवर लक्ष असते म्हणजेच सर्व गावावर देवाची कृपा असते. एवढ्या उष्ण वातावरणामध्ये कोणत्याही बालकाला इजा पोचवून दिली नाही.

पुढे मुगाव पासून मिरवणूक दसवडी कडे येण्यास तीन वाजले होते. मिरवणूक सोहळा भविष्य भूती डोळ्याची पारणे फुटावी असा होता. मंदिरासमोर येताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल वाजंत्री यांचा गजर होत होता. जणू काय ही रथयात्रा स्वर्गातूनच निर्माण होण्याचा आभास होत होता.जो व्यक्ती श्री चौनेश्वराची मनोभावना पूजा अर्चा करतो त्यास प्रसन्न रुपी आयुष्यभर वरदान लाभते. ही चौवनेश्वराची आखाईका आहे. बाल गोपालांना वर्षभर रक्षण करून आरोग्यमय, बुद्धिमय आनंदमय जीवन करतो असा हा महादेव अवतार श्री चौवनेश्वर देव आहे.श्री चौनेश्वराची बहिण कडसरी( कडजूबाई ) आहे.याच ग्राम शिवरा मध्ये वेताळ,भैरवनाथ, सेवागिरी, लक्ष्मीआई अशी देव दैवते पांढरी मध्ये आहेत.विधीपूर्वक देवांच्या मूर्ती धान्यामध्ये ठेवण्यात आल्या. आणि सायंकाळी पाच वाजता हभप श्री जगन्नाथ महाराज येराडकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला. पंचक्रोशीतील भजने मंडळी या कीर्तन सोहळ्यात सामील झाली होती.सव्वानऊ वाजता कीर्तन सोहळा पूर्ण झाला. महाराजांनी किर्तन रुपी सेवा करताना अत्यंत प्रभावीपणे देवाच्या जीर्णोद्धाराबद्दल माहिती देऊन निखळून हसवले. साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत रात्री महाप्रसाद होता. सर्व भक्तजनांनी लाभ घेतला.

सकाळी सर्व गावातील महिलांनी सात वाजता कृष्णा नदीतून पवित्र पाण्याचे 51 कलश भरून आणले.यावेळी नदीवरून येताना महिलांनी भक्तिमय गाणी गात मंदिरामध्ये कलश आणले.मूर्तीस दशस्तान देवता होमहवन करण्यात आले. सात जोडप्यांनी पूर्ण दिवसभर होम हवन करण्यात व श्री चौनेश्वराची प्रतिष्ठापना व पूजा करण्यात भाग घेतला होता.श्री मठाधीश सेवागिरी संस्थान सुंदरगिरी महाराज यांच्या शुभहस्ते कलशरोहन व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण दोन दिवसाच्या पोराहित्य पंडितजी अनिल काका पाचगणी आणि त्यांच्या अकरा ब्राह्मण टीमने केले. गावचे पुजारी यांनी सुद्धा मदत केली. त्याचबरोबर मूर्ती घडवण्याचे काम व वृज्जलेप त्याचे काम पुणे येथील मूर्तिकारांनी केले होते. त्यानंतर वाई येथील महिला भजन मंडळाचा भजन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसाद याचा लाभ भक्तजणांनी घेतला. संपूर्ण दिवस होम दर्शन व मूर्ती दर्शन भाविकांनी घेतले.

श्री चौनेश्वराच्या मूर्ती बरोबर त्यांच्या देवी भिल्लींन(पार्वती रूप) यांचे दर्शन घेतले. शेजारी हनुमंतरायांची मूर्तीची स्थापना सुद्धा झाली. त्याचबरोबर वृज्ज लेप करून महादेवच्या पिंडीची सुद्धा स्थापना करण्यात आली. पुरातन नंदी यांची वृज्ज लेप करून स्थापना झाली. त्यानंतर श्री चौनेश्वराची महाआरती करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता विश्वगुरू हभप नामदेव महाराज हरड(विद्वत परिषद काशी) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पंचक्रोशीतील भजनी मंडळाबरोबर साडेनऊ वाजेपर्यंत करण्यात आला. विश्वगुरू नामदेव महाराजांनी संत तुकाराम यांच्या जीवनावर कीर्तन करण्यात आले. त्यानंतर श्री चौनेश्वराचा गोंधळाचा वार्षिक कार्यक्रम करण्यात आला.

प्रथमच या कार्यक्रमाला सर्व महिला व माहेरवाशींनी गोंधळाच्या कार्यक्रमाला हजर होत्या. त्यानंतर श्री चौनेश्वराची पालखी सोहळा व छबीना सुरुवात करण्यात आली. सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत मिरवणूक व छबिना कार्यक्रम पार पडला. संपूर्ण कार्यक्रम गावातील दानशूर व्यक्तींनी सिंहाचा वाटा उचलला होता. तरुण मंडळांनी व युवकांनी अत्यंत मोलाची साथ देऊन कुठेही कार्यक्रमाला गालबोट लावून दिला नाही. अचूक नियोजन प्रत्येक वेळी दिसून येत होते. ग्रामस्थ मंडळ गेली दोन महिने अथक परिश्रम घेऊन देवाचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी करून दिला.

एक मार्च 2025 हा मुख्य यात्रेचा दुसरा दिवस असल्याने पूर्ण दिवस प्रतिष्ठापना प्रथमच दिवस साजरा करण्यात आला. आलेल्या पै-पाहुण्यांना प्रत्येकाच्या घरी शाकाहारी जेवण आस्वाद देण्यात आला.मिठाई आणि प्रसादाची दुकाने मधून प्रसाद देण्यात आला. दुसऱ्या दिवशी 2 मार्च संपूर्ण गावकीचा हिसाबाचा मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.आणि पुढील लक्ष्मी आईच्या पूजेचे नियोजन केले.पूर्ण दिवस सत्यनारायणाची महापूजा प्रसाद,भजन गोंधळ,व रात्री गोंधळी कार्यक्रम मध्ये संपन्न करण्यात आला. अशा भक्तिमय वातावरणामध्ये प्राणप्रतिष्ठा,गावची वार्षिक देवाची यात्रा, लक्ष्मीची महापूजा करण्यात आली.

लेखक : पर्यावरण संरक्षक, श्री तानाजी फणसे

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!