Thu, Jan 15, 2026
Media सातारा जिल्हा

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत
Ashok Ithape
  • PublishedMarch 5, 2025

सातारा दि. 5 – महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाली. शासकीय विश्रामगृहावर या समितीचे सातारा जिल्ह्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज व साताऱ्याचे खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी आवर्जून स्वागत केले.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील सर्व स्तरातील जनतेचे प्रश्न पत्रकार मांडत असतात. पण पत्रकारांचेही स्वतःचे त्यांच्या विस्तीर्ण समूहाचे प्रश्न असतात. भविष्यात केंद्र व राज्य स्तरावर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली कायम साथ असेल, असे यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्याकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समितीच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. समितीने खासदार उदयनराजे भोसले यांना या आपुलकीच्या स्वागताबद्दल धन्यवाद दिले.

यावेळी पुणे विभागीय माहिती उपसंचालक वर्षा पाटोळे, समिती सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव, अमन सय्यद, पुणे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.

सातारा येथे झालेल्या या बैठकीत पुणे, सोलापूर, व सातारा या जिल्ह्यातील पत्रकारांच्या अधिस्वीकृतिपत्रिकांच्या नूतनीकरण व पडताळणी बाबतचे कामकाज पार पडले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!