झेप उद्योगिनी आयोजित विकसित भारत – महिला उद्योजिका संमेलन २०२५ चे आयोजन
मुंबई : आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी व बचतगटाच्या माध्यमातून लाडक्या बहिणी, लाडक्या उद्योजिका बनवण्याचे काम आज झेप उदयोगीनी संस्थापक पूर्णिमा शिरीषकर करत आहे.

मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित ‘विकसित भारत महिला उद्योजिका २०२५’ संमेलनात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम, , डॉ. मंजू मंगलप्रभात लोढा (अध्यक्ष – लोढा फाऊंडेशन), नगरसेविका हर्षिता नार्वेकर, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेप’च्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर यांच्यासह ५०० हून अधिक स्वयम उद्योजिका ,बचत गटाच्या महिला आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरता बॅलन्स केमिस्ट्री व्हिडिओ वर्क ,मार्केइट ,ग्रीन एम फाउंडेशन ह्यांनी सहकार्य केलं
झेप उद्योगिनींची व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आयोजित या संमेलनात आयएएस महिला अधिकाऱ्यांच्या मुलाखती, निवड झालेल्या २२ महिलांचा ब्रँड वॉक शो, एमएसएमई उत्पादनांचे प्रदर्शन, चर्चासत्र, शासकीय योजनांचे माहितीसत्र, उद्योजिका पुरस्कार समारंभ तसेच लाडकी बहिण ते लाडकी उद्योजिका या प्रवासाची माहिती या सत्रांचा समावेश करण्यात आला













