Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये बाळासाहेब सणस व ॲड.संजय पवार यांची निवड.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये बाळासाहेब सणस व ॲड.संजय पवार यांची निवड.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 26, 2025

वाई : वाई येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सणस (व्हिजिलेंस) यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी व ॲड. संजय पवार (फलटण) यांची राष्ट्रीय सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाची भारतात 2005 साली कार्यस्थापना झाली बाळासाहेब सणस यांची प्रथमता वाई तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. या पदाच्या माध्यमातून काम करीत असताना सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नावर आवाज उठवत सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2019 साली त्यांना संघाच्या महाराष्ट्र राज्य (CM) अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली.

या माध्यमातून देशभरातील मानवाधिकार संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह समन्वय साधून त्यांनी महाराष्ट्रात देखील आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सलग पाच वर्ष महाराष्ट्र राज्य अध्यक्ष (CM) पदाची यशस्वी कारकिर्द सांभाळल्यानंतर संघाच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी त्यांची नुकतीच राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

देशपातळीवर अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब सणस, राष्ट्रीय सल्लागार पदी ॲड. संजय पवार  यांची निवड झाल्याबद्दल या दोघांचेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, ॲड आप्पासाहेब घोरपडे ,RPI चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव(बापू) गायकवाड, विजयसिंह नायकवडी माजी सभापती वाई पंचायत समिती संतोष सणस, बबन सणस माजी सरपंच आसरे व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि समाजातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!