Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

समाजात वैचारिक प्रगल्भता येण्यासाठी बुद्धिवंतांचं असणं गरजेचं – लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर

समाजात वैचारिक प्रगल्भता येण्यासाठी बुद्धिवंतांचं असणं गरजेचं – लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर
Ashok Ithape
  • PublishedFebruary 25, 2025

सातारा : समाजाची वैचारिक मशागत करण्यासाठी व समाजात वैचारिक प्रगल्भता येण्यासाठी बुद्धिवंतांचं असणं समाजासाठी गरजेचे असल्याचे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले

ज्येष्ठ विचारवंत नहर कुरुंदकर नरहर कुरुंदकर विचार मंचाच्या वतीने सातारा येथे आयोजित महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरा आणि नरहर कुरुंदकर या विषयावर गिरीश कुबेर बोलत होते. किशोर बेडकीहाळ यांनी या प्रास्ताविक व स्वागत केले.

महाराष्ट्रात अनेक तगडे विचारवंत होऊन गेले, की ज्यांनी वेळोवेळी जाती धर्म भेदाच्या पलीकडे जाऊन समाज जडणघडणीसाठ कणखर भूमिका मांडली.समाजाच्या जडणघडणीमध्ये अशा अनेक विचारवंतांची मोठी भूमिका राहिली. नरहर कुरुंदकरही त्याच विचारसरणीतले होते. त्यांनी धर्म, धर्मातीत भेदा भेद,जातीय वाद,समाज या पलीकडे जाऊन आपली भूमिका मांडली. कुरुंदकर हे त्या काळात होऊन गेले हे चांगले झाले. ज्या काळामध्ये लोक ऐकून घेत होते. इतर देशांमध्ये किंवा पश्चिम बंगाल मध्ये असे बुद्धिवादी जन्माला आले असते तर तेथील लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते. एवढा कुरुंदकरांचा आवाका एवढा मोठा होता. त्यांनी व्यंगशास्त्र,सौंदर्यशास्त्र, नाट्य समीक्षा, धर्म समीक्षा, कलाविश्व, सामाजिक आणि राजकारण या विषयावर सडेतोड मांडणी केली आहे. हल्ली ते असते तर ते अनेकांना झेपले नसते आणि दुर्लक्षित करून त्यांना संपवले असते.

महाराष्ट्रात सध्या वैचारिक परंपरा सांगितली जात नाही. बुद्धिवाद्यांमध्ये वाद विवाद होत नाहीत. मात्र आपण युरोप आणि पाश्चिमात्य देशांमध्ये मोठे वैचारिक पुनरुत्थान झाले, त्यातून ते देश घडले याची चर्चा करतो. समाज घडण्यासाठी वैचारिक पुनरुत्थान गरजेचे असते. महाराष्ट्राच्या वैचारिक आणि बौद्धिक परंपरांची मांडणी ही त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरांचे बाळशास्त्री जांभेकर यांचेही मोठे योगदान आहे. हिंदू धर्म अल्पसंख्यांकवाद धर्मातील संकुचितपणा आदी बाबींवरही त्यांनी कणखर भूमिका मांडली.

धर्म आणि नैतिकता याचा काही संबंध नाही असे कुरुंदकर म्हणत. धर्म आणि जाती बद्दल गर्व बाळगताना आपण महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचाही गर्व बाळगायला हवा. माणसाच्या विचारसरणीला हादरवेल अशी मांडणी कुरुंदकरांनी केली. हिंदू धर्मातील संकुचितता, भारतीय मानसिकता, सनातनी विचार, मुस्लिम अल्पसंख्यांकवाद यावरही कुरुंदकरांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. प्रौढ मतदानाने सुप्त जातिवाद पुन्हा वर आला. धर्माच्या विचारसरणीतील गोंधळ आपण मान्य करत नाही. त्यामुळे पूर्वीच्या बुद्धिवाद्यांनी मांडलेल्या समाज सुधारणांचे पुढे काय झाले हा प्रश्नच आपल्याला पडत नाही. संघटना हे धर्माचे सामर्थ्य नसते तर ते दुबळे पण असते असेही ते म्हणत. धर्मातील आणणाऱ्या गोष्टी कोणाकडे मांडायच्या हाही एक प्रश्न आहे.

विचारवंत आणि बुद्धिवादी यांनी केलेली समाजाची वैचारिक मशागत वादातीत आहे. समाजाची वैचारिक जडणघडण करण्यासाठी समाजालाच विचारवंतांची गरज असते. त्यावेळी ज्या वेळेला देशामध्ये आणि राज्यांमध्ये सामाजिक सुधारणा होत होत्या त्यावेळेला महाराष्ट्र हा देशाला मार्गदर्शक आणि तर्कवादामध्ये फारच पुढे होता. हे सर्वांना मान्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्राची वैचारिक शक्ती प्रगल्भ झाली. आज महाराष्ट्र कुठे आहे हे ही मात्र शोधावे लागेल असेही गिरीश कुबेर म्हणाले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!