Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

कोकण टीडीएफच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सागर पाटील ! कार्याध्यक्षपदी पालघर चे संतोष पावडे तर सचिव पदी रायगडचे राजेंद्र पालवे यांची निवड

कोकण टीडीएफच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सागर पाटील ! कार्याध्यक्षपदी पालघर चे संतोष पावडे तर सचिव पदी रायगडचे राजेंद्र पालवे यांची निवड
Ashok Ithape
  • PublishedFebruary 24, 2025

महाराष्ट्र टीडीएफचे राज्य अधिवेशन पालघर मध्ये होणार.

रायगड : कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीची बैठक नुकतीच रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतपेढी मर्यादित पेन या ठिकाणी राज्य कार्याध्यक्ष नरसू पाटील व राज्य सहसचिव रोहित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.या बैठकीमध्ये कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीची पुढील पाच वर्षासाठीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कोकण विभागीय टीडीएफच्या अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष व रत्नागिरी माध्यमिक पतपेढीचे चेअरमन सागर पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.कार्याध्यक्ष पदी पालघर चे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संतोष पावडे तर सचिव पदी रायगड माध्यमिक पतपेढीचे चेअरमन व सुधागड शिक्षण संस्थेचे सदस्य राजेंद्र पालवे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कार्याध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सभेल सुरुवात करण्यात आली. यावेळी सभाध्यक्ष नरसू पाटील यांनी आपल्या मनोगतातून टीडीएफ चा इतिहास उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. शिक्षण क्षेत्राला आज टीडीएफ ची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकारणी पदाधिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदी मायकल घोंसालविस (वसई), रमेश म्हात्रे (रायगड), अंबर घोलप (ठाणे), अविनाश पाटील (रत्नागिरी), अजय शिंदे (सिंधुदुर्ग) , सहसचिव पदी सुशांत कविस्कर (रत्नागिरी), विजय मयेकर (सिंधुदुर्ग) ,कोषाध्यक्षपदी सुरेंद्र शिंदे (ठाणे), संघटक पदी गणेश प्रधान (पालघर), संभाजी देवकते (रत्नागिरी), महिला प्रतिनिधी म्हणून अर्चिता कोकाटे (रत्नागिरी) व मीनल गायकवाड (पालघर)यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून रुपेश वझे,(डहाणू ),रमाकांत गावंड (रायगड), सचिन मिरगल (रत्नागिरी), अशोक गीते (सिंधुदुर्ग) यांची निवड करण्यात आलेली आहे.स्वीकृत सदस्य म्हणून के डी पाटील (पालघर), भालचंद्र नेमाडे (मीरा-भाईंदर) व विनोद पन्हाळकर (रायगड )यांचा समावेश कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीच्या कार्यकारणी मध्ये करण्यात आलेला आहे.

या सभेमध्ये उपस्थित सर्व कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडीचे सभासद व पदाधिकारी यांनी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य अधिवेशन कोकण विभागातील पालघर जिल्ह्यामध्ये घेण्यात यावी अशी मागणी राज्याचे कार्याध्यक्ष नरसु पाटील व सहसचिव रोहित जाधव यांच्याकडे केली असून राज्य संघटनेने त्याला मान्यता दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य अधिवेशन पालघर या ठिकाणी संपन्न होणार आहे
कोट

कोकण विभागाची प्रादेशिक रचना लक्षात घेता उर्वरित महाराष्ट्र प्रमाणे शैक्षणिक धोरणे कोकण विभागाला लागू करता येणार नाहीत.कोकण विभागासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण राबविणे आवश्यक आहे, हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कोकण विभागीय टीडीएफच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सन्माननीय शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) यांच्यासोबत सह विचार सभा घेऊन जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न जिल्हास्तरावर मार्गी लावण्यासाठी कोकण विभागीय टीडीएफ प्रयत्नशील राहणार आहे.
– सागर पाटील (अध्यक्ष) कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!