प्राथमिक शाळा वेलंग येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न
वाई : दिनांक २० फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलंग येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. श्री काळभैरव यात्रेनिमित्त श्री भैरवनाथ सेवा तरुण विकास मंडळ वेलंग- मुंबई यांजकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष श्री रमेशदादा गोळे उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीच्या विद्यमान अध्यक्षा सौ.पुनमताई दत्तात्रय जेधे आणि पोलिस पाटील सौ.सविताताई जेधे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी गोळाफेक या क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळविलेल्या आणि राज्यस्तरावर निवड झालेल्या सोहम महांगडे या विद्यार्थ्याचा विशेष सन्मान करण्यात आला. मंडळाच्या माध्यमातून शाळेला आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी बाळकृष्ण साळेकर यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री महादेव पवार यांनी केले.













