Mon, Mar 2, 2026
सामाजिक

उत्कर्ष पतसंस्थेतर्फे भुईंज येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

उत्कर्ष पतसंस्थेतर्फे भुईंज येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedFebruary 13, 2025

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात भुईंज मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

वाई : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या उत्कर्ष पतसंस्थेने नागरिकांसाठी निरोगी आरोग्याच्या जनजागृतीसाठी सदरचा उपक्रम हाती घेतला असून, यामध्ये नेत्र तपासणी करून जर कोणत्याही नागरिकास मोतीबिंदू आढळल्यास त्यांची मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी प्रास्ताविकेत सांगितले.

या उपक्रमाचा श्री गणेशा भुईंज गावामधून झाला. आरोग्याबाबत नागरिकांमध्ये करीत असलेली जनजागृती प्रति कार्यक्रमाचे अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा श्री पतंगराव पाटील साहेब यांनी संस्थेचे विशेष कौतुक केले. तसेच उत्कर्ष पतसंस्थेने प्रजासत्ताक दिना निमित्त ग्राहकांसाठी सुरु केलेल्या प्रजासत्ताक ठेव योजना ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांचेसाठी 9.60% व्याजदर जाहीर केला असून सर्वाधिक व्याजदर व गुंतवणूकीची सुरक्षितता असे दुहेरी फायदे आणि त्याच सोबत सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असणारी उत्कर्ष पतसंस्था असा नामलौकिक संस्थेचा असून या शिबिराचा अधिकाधिक लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा श्री सुरज शिंदे साहेब यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रमासाठी भुईंज गावचे सरपंच मा श्री विजय शंकर वेळे, उपसरपंच श्री शुभम अण्णा पवार, योग प्रशिक्षक मा श्री सागर दळवी मान्यवर म्हणून उपस्थित होते. एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांचे प्रतिनिधी श्री महेश क्षीरसागर व प्रभुणे क्लिनिक सातारा यांचे डॉ सचिन प्रभुणे यांच्या सहकार्यातून सदर शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी संस्थेच्या पाचवड शाखेचे सल्लागार श्री बाळकृष्ण वाघ यांनी निरोगी आरोग्याचे महत्व सांगितले. तसेच संस्थेचे हितचिंतक श्री अंकुश शिंदे यांनी संस्थेच्या आर्थिक व सामाजिक दोन्ही कामांचे विशेष कौतुक केले व भुईंज मध्ये देखील आपण उत्कर्ष पतसंस्थेची शाखा सुरु करण्याची मागणी भुईंज गावातील नागरिकांच्या वतीने केली.

हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे व विशेष पाचवड शाखेतील कर्मचारी यांचे विशेष आभार संस्थेचे संचालक श्री अमर कोल्हापुरे यांनी व्यक्त केले. तसेच माजी आमदार श्री मदनदादा भोसले व भा.ज.पा. सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरभीताई भोसले यांनी कार्यक्रम स्थळी आवर्जून भेट दिली त्याबद्दल देखील त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे , संचालक श्री अमर कोल्हापुरे, संचालिका श्रीमती अलकाताई घाडगे , सन्माननीय सल्लागार समिती सदस्य श्री जयवंत पवार, श्री बाळकृष्ण वाघ, श्री दिलीप थोरवे, श्री राहुल ( भैय्या ) तांबोळी, माजी उपसरपंच श्री प्रशांत जाधवराव, युवा उद्योजक श्री अभिजित जाधव, श्री महेंद्र जाधव, श्री शिवाजी सावंत, श्री सुनील शेवते, श्री जयवंत पिसाळ, श्री कृष्णात घाडगे उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!