पत्रकार दत्ता घाडगेंचा शनिवारी कराडमध्ये आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मान होणार
सातारा / प्रतिनिधी :
कामेरी (ता. सातारा) येथील ‘लोकराज्य न्यूज वन’ चे संपादक श्री.दत्तात्रय कृष्णत घाडगे यांना यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्ताने यावर्षीचा (स्व.) यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून शनिवारी, दि.8 फेब्रुवारी रोजी कराड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दत्तात्रय कृष्णत घाडगे यांनी नाशिक येथून पत्रकारितेची पदवी घेत
सन 2010 पासून पत्रकारीतेस प्रारंभ केला दै.महासत्ता, तरूण भारत, पुढारी, प्रभात या दैनिकात काम केले. यामध्ये सामाजिक विषयावर लेखन करत असताना
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आपल्या लेखनीच्या माध्यमातून केले असून गोडवा, अँग्रोटेक, शेतीप्रगती यासारख्या मासिकांतसुद्धा प्रगतशील शेतकरी यांच्या यशोगाथाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना प्रकाशझोतात आणले तसेच आपल्या लिखाणाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून देण्याचा त्यांचा मोलाचा सहभाग आहे
सन 2021 ते 23 मध्ये नागठाणे विभाग पत्रकार संघाचे उपाध्यक्षपद भूषवत असताना अनेक सामाजिक उपक्रम सुरु केले. दरम्यान, त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली असून ती जबाबदारी ते आपल्या सहकारी बंधूना सोबत घेऊन पार पाडत आहेत. सातारा तालुक्यात दत्तात्रय घाडगे यांची स्पष्ट वक्ता, व निर्भिड,निपक्ष: पत्रकार म्हणून त्यांची ओळख असून पत्रकारीतेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय,सामाजिक, कृषी,उद्योग, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य, तसेच प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱा मित्रसमूह त्यांनी जोडलेला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल या अष्टपैलू युवा पत्रकाराचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













