Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

सपोनि रमेश गर्जे यांचे कार्य कौतुकास्पद.. पोलीस अधिक्षक समीर शेख यांचे प्रतिपादन

सपोनि रमेश गर्जे यांचे कार्य कौतुकास्पद.. पोलीस अधिक्षक समीर शेख यांचे प्रतिपादन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 31, 2025

भुईंज l भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी समाजाला चांगला संदेश देणारे कार्यक्रम राबवले असुन गावागावात जनसंपर्क वाढवल्यामुळे व चांगले उपक्रम राबवल्यानेच त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले.

दरम्यान यावर्षीचा गणराया अवॉर्ड 2024 चा मान वेळे व पाचवड गावाने पटकावला. भुईंज ता.वाई येथील भुईंज पोलीस स्टेशनच्या वतीने श्री गणराया अवॉर्ड 2024 चे वितरण पाचवड येथील सह्याद्री मल्टीपर्पज हॉलमध्ये दिमाखदार सोहळ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी वाई उप विभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, भुईंज पोलीस स्टेशन सपोनि रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरज शिंदे, प्रदीपसिंग परदेशी, पाचवड गावचे सरपंच महेश गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले की गणराया अवॉर्ड वितरणास इलेक्शन व बंदोबस्त यामुळे उशीर झाला. भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांची काम करण्याची पद्धत चांगली आणि कौतुकास्पद असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे आपल्या सर्वांच्या उपस्थितीतून जाणवत आहे. त्यांनी प्रशासन आणि लोकांच्या मध्ये सामंजस्य घडवत आपले प्रशासकीय काम योग्य पद्धतीने करीत आहेत. येणाऱ्या 2025 सालामध्ये सुध्दा हा कार्यक्रम अजून कसा जोरदार आणि उठावदार होईल तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील गणेश उत्सव मंडळांना यात समाविष्ठ करून घेऊन ज्या गावांमध्ये अजून एक गाव एक गणपती ही योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे समीर शेख यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे म्हणाले की भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करीत गणराया अवॉर्ड  साठी सहकार्य केले मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की माझ्या पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात डॉल्बी वाजत नाही आणि इथून पुढेही वाजणार नाही. असेच आम्ही सर्व उत्सव पारंपारिक पद्धतीने पार पाडू व पोलीस अधीक्षक समीर शेख या कार्यक्रमाला आल्याने या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे, साहेबांनी ज्या संकल्पना सांगितल्या त्या आम्ही चांगल्या पद्धतीने राबवू असे सर्वांचे वतीने आपणास आश्वासन देतो.

यावेळी गणराया अवार्ड 2024 प्रथम क्रमांक पाचवड येथील नवतरुण गणेश मंडळ व वेळे येतील रणसंग्राम गणेश मंडळ यांना विभागून देण्यात आले तर द्वितीय क्रमांक विजयनगर भुईंज येथील जय हिंद गणेशोत्सव मंडळ तर तृतीय क्रमांक राजधानी मित्र मंडळ ओझर्डे यांना मिळाले त्यांचे ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील यांना प्रशस्तीपत्रक व जर्किन भेट देण्यात आले व अपघात स्थळी पोलिसांना ठिकठिकाणी मदत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

गणराया अवार्ड मध्ये परीक्षक असणाऱ्या सर्वांचा उचित सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी पाचवड येथील तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी व त.ल.जोशी विद्यालय वाईचे विद्यार्थी यांचा याठिकाणी सन्मान करण्यात आला.

गणराया अवॉर्ड 2024 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भुईंज पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे सचिन नलावडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल माने तर आभार भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रमेश गर्जे यांनी मानले.

सिंघम रमेश गर्जे यांनी केला भुईंज पोलीस स्टेशनचा कायापालट….

भुईंज पोलीस स्टेशनचे कारभारी रमेश गर्जे यांनी भुईंज पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासून त्यांनी चांगल्या प्रकारे क्राइम रेट कमी केला असून घडलेल्या क्राईम मध्ये तात्काळ तत्परता दाखवत गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांसाठी ते सिंघमच ठरले आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांनी भुईंज पोलिस स्टेशनचा कायापालट करीत सर्व पोलीस स्टेशनला उत्कृष्ट पद्धतीने रंगरंगोटी दोन्ही सेकंड अधिकाऱ्यांना बसण्यासाठी नवीन अद्यावत रूम, अमंलदारांना बसण्यासाठी भव्यदिव्य हॉल, फरशी आणि अद्यावत फर्निचर आणि महिलां पोलिसांच्या रूम अद्यावत केल्या असून सातारा जिल्ह्यातील एक नंबरचे पोलीस स्टेशन असाच कायापालट त्यांनी भुईंज पोलीस स्टेशनचा केला आहे. त्यामुळे रमेश गर्जे यांनी केलेल्या कामाची आठवण कायम राहील.

फोटो ओळी
भुईंज पोलीस स्टेशन आयोजित गणराया अवार्ड 2024
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक समीर शेख, वाई उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम, भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे आदी मान्यवर

छायाचित्र किशोर रोकडे, भुईंज.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!