Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 30, 2025

नवी दिल्ली, दि. 30 : नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे सांगितले.  दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणारे साहित्य संमेलन यशस्वी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील साहित्य संमेलनासाठीच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दिल्लीत होणारे साहित्य संमेलन निश्चित भव्य असे होईल. हे संमेलन देश नव्हे, तर जगभरातील मराठी माणसांकरिता अभिमानास्पद ठरेल. साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या या संमेलनास विशेष महत्व आहे. राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत मराठी साहित्यिक उत्सूक असून हे संमेलन विचारप्रवर्तक ठरेल, साहित्य संमेलनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

दिल्लीतील मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरी सत्कार

दिल्लीतील विविध मराठी मंडळाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दिल्लीत अनेक वर्षापासून राहत असलेल्या मराठी लोकांनी मुख्यमंत्री यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. मुख्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून दिल्लीतील मराठी मंडळांसाठी आणि येथील वास्तूंसाठी निश्चित योग्य ती पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!