Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रशस्त घरांची होणार स्वप्नपूर्ती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून  मुंबईकरांच्या प्रशस्त घरांची होणार स्वप्नपूर्ती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ashok Ithape
  • PublishedJanuary 30, 2025

प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची केली पाहणी

मुंबईदि. 30 : प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदरप्रशस्त घर असावे हे  स्वप्न असते. मुंबईकरांनीही हेच स्वप्न उराशी बाळगले आहे. घराच्या समस्येमुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे. अशा मुंबईकरांना पुन्हा मुंबईत परत आणून शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून त्याच्या प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेअशी ग्वाही आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

काही विकासक विकास करण्यासाठी घेतलेल्या इमारती सोडून गेलेत्यांनी रहिवाशांना भाडेही अदा केले नाही. अशा विकासकांना काढून टाकणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेसामान्यांना परवडणारे व प्रशस्त असे घर देण्यासाठी वेळ पडल्यास नियमकायद्यात बदल करावयाच्या असल्यास तेही करण्यात येतील.  त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या समोर असे निर्णय आणले जातील. रखडलेल्या पुनर्विकासाच्या कामांना सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून गती देण्यात येईल.  ठाण्यातही अशा पद्धतीने सामूहिक पुनविकास योजना सुरू झालेली आहे. सामूहिक पुनर्विकास योजना राबविताना येत असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील.

एसआरएम्हाडाएमआयडीसीएमएमआरडीएसिडको व बीएमसी या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामूहिक पुनर्विकासाची योजना राबविण्यात येईल.  सामान्य मुंबईकरला प्रशस्त घर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून प्राथमिक सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल. यामध्ये बगीचाआरोग्याच्या सुविधाखुले मैदान आदींचा समावेश असेल. शासन लवकरच गृहनिर्माण धोरण आणत आहे. यामध्ये म्हाडाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकविद्यार्थीकाम करणाऱ्या महिलागिरणी कामगार यांच्यासाठी घरांची उपलब्धता आणि परवडणारी घरेपरवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या माध्यमातून गणेश भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे गणेश भक्तांची होणारी गैरसोय दूर होईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी व्यक्त केला.

सुरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभादेवी येथील सहा समुह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी  केली. पाहणीनंतर दादरमाहिम व प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकास संदर्भात आढावा कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहशिवाजी पार्कदादर येथे पार पडला. व्यासपीठावर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकरउपाध्यक्ष श्री. जैस्वालएसआरए चे मिलिंद शंभरकरश्री कल्याणकर आदीसह लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी अध्यक्ष श्री. सरवणकर यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला प्रभादेवीमाहीमदादर भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!