Fri, Apr 17, 2026
शिक्षण

नवीन तंत्रज्ञानच देशातील बेरोजगारी कमी करू शकेल – मा. आमदार मदनदादा भोसले

नवीन तंत्रज्ञानच देशातील बेरोजगारी कमी करू शकेल – मा. आमदार मदनदादा भोसले
Ashok Ithape
  • PublishedJanuary 20, 2025

विद्यार्थ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे असे उद्गार जनता शिक्षण संस्था वाईचे अध्यक्ष श्री मदन भोसले यांनी काढले.

वाई शहरात नव्याने निर्माण होत असलेल्या शिवम घोरपडे यांनी काढलेल्या ॲनिमेशन व हार्डवेअर कोर्सेस प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मदनदादा बोलत होते .

ते पुढे म्हणाले ॲनिमेशन या तंत्रज्ञानाची माझी ओळख वीस वर्षांपूर्वी झाली. अशा प्रकारे शिक्षण देणारी संस्था आपल्या शहरात आणण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर आनंद घोरपडे व सौ. सुजाता घोरपडे यांनी आपला मुलगा शिवम याला पुणे येथील ॲनिमेशन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग वाई परिसरातील तरुण मुला-मुलींना व्हावा यासाठी वाई शहरातील किसन वीर चौक या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीने युक्त व चांगले प्रशिक्षक असणारी संस्था उभी केली आहे तरी मुलांनी याचा लाभ घ्यावा.

या प्रसंगी पुणे येथील Tron या ॲनिमेशन संस्थेचे सेंटर हेड प्रा.अमर साखरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते मार्गदर्शन करताना ते म्हणाले माझ्या संस्थेचा विद्यार्थी शिवम घोरपडे याने सर्व तंत्रज्ञान आत्मसात केल्यानंतर अशा प्रकारे प्रशिक्षण संस्था उभी करणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

ॲनिमेशन हे तंत्रज्ञान आज वेगवेगळ्या क्षेत्रात जसे की जाहिरात ,चित्रपट, विविध ऑनलाइन गेम ,कार्टून नेटवर्कच्या माध्यमातून विकसित होत आहे या क्षेत्रात तरुणांना ऑनलाइन तसेच ऑफ लाईन व फ्रीलान्सिंग ,वर्क फ्रॉम होम इत्यादी ठिकाणी भरपूर रोजगाराच्या संधी आपल्या आसपासच उपलब्ध होत आहे
याप्रसंगी आणखी एक विशेष अतिथी श्री संदीप केंजळे क्रेझी क्रिएशन सातारा उपस्थित होते त्यांनी ॲनिमेशन क्षेत्रातील अनुभव सांगत असताना अनेक मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असा उल्लेख केला.

झी कॅट संस्थेत ॲनिमेशन बरोबरच मोठ्या नोकऱ्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध असलेले विविध हार्डवेअर कोर्सेस आय आर सी टी सांगली या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत ,याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या संस्थेचे डायरेक्टर श्री महेश लकडे म्हणाले हार्डवेअर या क्षेत्राचे प्रशिक्षण घेतल्यास त्वरित रोजगार उपलब्ध होत होऊ शकतो, जसजसे संगणक विकसित होत आहे तसं तसे त्याच्या दुरुस्तीची समस्या वाढत आहे, हॅकिंग समस्या वाढत आहे त्यामुळे हार्डवेअर मेकॅनिक व इथिकल हॅकिंग प्रशिक्षणाची आवश्यकता वाढत जाते यासाठी हे प्रशिक्षण केंद्र युवकांना तज्ञ मार्गदर्शन करून प्लेसमेंट सुविधा उपलब्ध करून देईल असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी श्री व सौ घोरपडे यांनी सर्वांचे स्वागत केले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .शिवम घोरपडे, डायरेक्टर झी कॅट इन्स्टिट्युट यांनी ॲनिमेशनचे विविध सॉफ्टवेअर वापरून तयार केलेले प्रेझेंटेशन उपस्थितांना सादर केले या कार्यक्रमात झी कॅटची ॲडमिशन घेतलेली पहिली विद्यार्थिनी कुमारी श्रुती बावळेकर हिचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गणेश चव्हाण यांनी केले.

या कार्यक्रमास किसन वीर कारखान्याचे माजी संचालक श्री चंद्रकांत इंगवले, किसन वीर कॉलेजचे माजी प्राचार्य श्री रमेश डूबल, Tron ॲनिमेशन संस्थेचे प्रशिक्षक श्री लक्ष्मीकांत जाधव, श्री प्रकाश वेदपाठक, झी कॅट संस्थेचे प्रशिक्षक मुत्तलीफ खान, भास्कर मोरे तसेच इतर मान्यवर व वाईकर नागरिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!