Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

वाई, खंडाळा महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा – मंत्री मकरंद जाधव-पाटील

वाई, खंडाळा महाबळेश्वर मधील प्रलंबित कामे मार्गी लावा  – मंत्री मकरंद जाधव-पाटील
Ashok Ithape
  • PublishedJanuary 15, 2025

मुंबईदि. १४ :-  वाईखंडाळामहाबळेश्वर मधील जलसंपदा विभागाकडील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिल्या. पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळकार्यालयात झालेल्या बैठकीत मदत व पूनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी सूचना दिल्या.

या बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेमुख्य अभियंता  ह. वि. गुणाले व ह. तु. धुमाळउपविभागीय अधिकारी श्री. कचरे  यांच्यासह  जलसंपदा विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कवठे-केंजळ उपसा सिंचन योजनाजांभळी बंधाऱ्याची उंची वाढविणेजललक्ष्मी योजना-आकोशी पाणी पुरवठा योजनादेवघर उपसा सिंचन योजनाबळकवडी-देवघर योजनेतून खंडाळा तालुक्यातील वंचित १४ गावांना पाणी उपलब्ध करुन देणे आणि नागेवाडी धरणामध्ये भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!