जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच. एम परिक्षेचे आयोजन
सातारा, दि.10 (जि.मा.का.): शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ ( जी.डी. सी ॲण्ड ए बोर्ड) पुणे या मडंळाकडुन घेण्यात येणारी जी.डी.सी ॲण्ड ए बोर्डाची परिक्षा दिनांक २३ ते २५ मे या तीन दिवसाच्या कालावधीत केंद्र साकेंतीक क्रमांक –१२ सातारा या केद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेचे फॉर्म फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येतील. युजर आयडी व पासवर्ड परिक्षार्थीने निकाल लागेपर्यंत जपुन ठेवावा.
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ९ जानेवारी ते २५ जानेवारी २०२५ पर्यंत – https:gdca.maharastra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत भरावा. परिक्षा शुल्क जी.डी.सी. एण्ड ए परिक्षा फि. रु. ८०० व सी एच एम परिक्षा फी ५०० इतकी असेल.परीक्षार्थीनी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत अटी व शर्ती व सविस्तर अधिसुचना खात्याच्या http://sahakarayukta. maharastra. Gov.in या संकेत स्थळावर देण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.













