Thu, Jan 15, 2026
यशोगाथा

देऊरचा अनिकेत शिंदे यूपीएससी परीक्षेत देशात १८ वा

देऊरचा अनिकेत शिंदे यूपीएससी परीक्षेत देशात १८ वा
Ashok Ithape
  • PublishedJanuary 8, 2025

वाई l प्रतिनिधी : देऊर ता. कोरेगाव चे सुपुत्र अनिकेत नंदा जितेंद्र शिंदे यांनी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये देशात १८ वा क्रमांक पटकावला. त्यांची इपीएफओ अंमलबजावणी अधिकारी, भारत सरकार या पदी निवड झाली आहे. यापूर्वीही त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२३ परीक्षेमध्ये राज्यात ९२ वा क्रमांक मिळवून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकारी पदी निवड झाली आहे.

शिंदे यांचे शिक्षण देऊर येथील श्री मुधाईदेवी विद्यामंदिर येथे व त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सयाजीराव हायस्कूल सातारा येथे झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे त्यांनी बि. टेक ही अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. कुटुंबाच्या व मित्र-मैत्रिणींच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि अभ्यासातील सातत्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!