सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सातारकर मित्रांचा सामाजिक उपक्रम
सातारा : सोशल मीडियाच्या माध्यमातून सातारकर जिवलग प्रेमी गेल्या सात वर्षापासून एकत्र येऊन सामाजिक क्षेत्रात मदतीचे योगदान देत आहेत, या समूहाचे सदस्य कामानिमित्त मुंबई पुणे सातारा इतरत्र ठिकाणी कार्यरत असून वर्षातून एकदा सर्व एकत्र येऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत आहेत
यावर्षी श्री. महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महायोगी गगनगिरी विध्यार्थी वसतिगृह कापसेवाडी याठिकाणी शालेयपयोगी साहित्य मदत करण्यात आली तसेच वाई तालुक्यातील यशोधन अनाथ आश्रम वेळे ता. वाई जि. सातारा या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. या कार्यक्रमास भुईंज पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री पाटील, यशोधन ट्रस्टचे सर्वोसर्वा श्री रवी बोडके, तसेच सातारकर जिवलग प्रेमी सर्व सदस्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तावीक या ग्रुपचे सदस्य तसेच देगाव गावचे सरपंच सुरज पिसाळ यांनी केले. भुईंज पोलीस स्टेशन चे PSI मा.पाटील यांनी त्यांच्या मनोगतामध्ये ग्रुपचे कौतुक केले त्यानंतर यशोधन अनाथ आश्रमचे सर्वेसर्वा श्री रवी बोडके यांनी अनाथ लोकांबद्दलची आत्मीयता आणि आपले मनोगत व्यक्त केले तसेच आश्रमाबद्दल माहिती दिली सातारकर जिवलग प्रेमी समूहातर्फे वेळोवेळी यशोधन अनाथ आश्रमाला मदत करण्याचे आश्वासन दिले व समूहातर्फे श्री दिपक चव्हाण यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.













