Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन

ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन
Ashok Ithape
  • PublishedDecember 29, 2024

शिवसेना पक्षाच्या जडणघडणीत बजावली होती महत्त्वाची भूमिका; सोमवारी अंत्यसंस्कार

ठाणे l नंदकुमार बाबर

शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, त्याच सोबत ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. दुपारी 2 च्या सुमारास सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. शिवसेना पक्षाच्या जडणघडणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

सतीश प्रधान यांचे दुपारी दोन वाजता निधन झाले असून सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवसस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसेना व ठाणे शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

सतीश प्रधान यांची तब्येत काही दिवसांपासून खालावली होती. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. ठाणे येथील गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांचे निधन झाले आहे. सतीश प्रधान यांनी ठाण्यात अनेक विकासकामे केली आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालय 1980 साली त्यांनीच स्थापन केले. ठाणे शहरात महापौर मॅरथॉन त्यांनीच सुरू केली होती.

सतीश प्रधान यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असा त्यांचा परिवार आहे. सतीश प्रधान यांच्या जाण्याने कुटुंबीयांमध्ये तसेच ठाण्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!