Mon, Mar 2, 2026
आरोग्य

गीतांजली हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी

गीतांजली हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी
Ashok Ithape
  • PublishedDecember 28, 2024

सवलतीच्या दरात उपचार व शस्त्रक्रियांचे आयोजन

वाई / प्रतिनिधी : येथील गीतांजली मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 6 ते 12 जानेवारी या सप्ताहात मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात उपचार व शस्त्रक्रिया उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती हॉस्पिटलतर्फे देण्यात आली आहे.

वाई परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी डॉ. जयघोष कद्दू यांनी चार दशकांपूर्वी कृष्णा काठावर गीतांजली हॉस्पिटलची स्थापना केली. योग्य मार्गदर्शन व नेमके उपचार आणि आपुलकीतून रुग्णांना समजावून घेत केले जाणारे उपचार यामुळे गीतांजली हॉस्पिटलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. विविध आजारांवरील उपचारांसाठीची सुविधाही या रुग्णालयात उपलब्ध होत असल्याने मोठ्या श्रद्धेने रुग्ण औषधोचारांसाठी गीतांजली हॉस्पिटलमध्ये येत असतात. या पार्श्वभूमीवर दि. 6 ते 12 जानेवारी या सप्ताहात गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे सामाजिक बांधिलकीतून सर्व आजारांवरील रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

सोमवार, दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पोटदुखी, थायरॉईड, स्तनाचे आजार, अल्सर व डायबेटिसमुळे झालेल्या जुनाट जखमा, मुळव्याध, हर्निया, अपेंडिक्स, भगेंदर, पायावर फुगलेल्या रक्तवाहिन्यांच्या वेदना याबाबत जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जन व एंडोस्कोपिस्ट डॉ. सिद्धांत जयघोष कद्दू उपचार करणार आहेत.

मंगळवार, दिनांक 7 जानेवारी रोजी प्लास्टिक सर्जरी क्षेत्रातील तज्ञ डॉ. पुष्कर देशपांडे रुग्ण तपासणी करणार आहेत. दुभंगलेले ओठ व टाळा, वेड्यावाकड्या नाकावरील शस्त्रक्रिया, शरीरातील अतिरिक्त चरबी काढणे, हात व पायाची चिकटलेली बोटे, डायबेटिसच्या व इतर न भरून येणाऱ्या जखमा, केशरोपन, त्वचारोपण, जळालेल्या त्वचेवरील शस्त्रक्रिया, हात व बोटातील विकृती या आजारांवरील उपचार ते करणार आहेत.

बुधवार, दिनांक 8 जानेवारी रोजी जनरल फिजिशियन डॉ. ऋचा सिद्धांत कद्दू या सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात, थायरॉईड, लकवा, श्वसन विकार किडनी विकार या आजारांवरील रुग्णांची तपासणी करणार आहेत.

गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी हृदयरोग तज्ञ डॉ. भूषण पाटील हे दुपारी बारा ते तीन या वेळेत छातीत दुखणे व धडधडणे, घाम येणे, चालताना दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे व हृदयरोग आदींबाबत रुग्ण चिकित्सा करणार आहेत. तर त्याच दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत हृदय, छाती व रक्तवाहिन्यांचे शल्यचिकित्सक डॉ. हर्षवर्धन सायगावकर हे बायपास सर्जरी, हृदयाची झडप बदलणे, शिरा फुगणे व रक्तवाहिन्याशी संबंधित शस्त्रक्रिया, पायावरील फुगलेल्या शिरांचे प्रसरण होणे, बोटे निळसर होणे, जन्मजात हृदयविकार, पायातून गोळे येणे आदी आजारांवरील रुग्णांची तपासणी करणार आहेत.

शुक्रवार, दिनांक 10 जानेवारी रोजी मूत्रविकार तज्ञ डॉ. सायली पाटील सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत किडनी स्टोन, प्रोस्टेट ग्रंथी, मूत्रमार्गातील सर्व प्रकारचे खडे, किडनी संबंधित विकार आदींबाबत रुग्ण चिकित्सा करणार आहेत.

शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी  ऑन्कोसर्जन डॉ. मनोज लोखंडे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील उपचार, व्यवस्थापन आणि कॅन्सरमुळे उद्भवलेल्या शारीरिक गुंतागुंतीवर योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. तर त्याच दिवशी त्याच वेळी मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. श्रेयस जैन हे जबड्याचे फ्रॅक्चर, इम्प्लांट प्लेट्स बसवणे, तंबाखू – गुटख्यामुळे जबड्याचे उद्भवलेले आजार अक्कलदाडेच्या समस्या, वारंवार तोंड येणे, चरे पडणे याबाबत रुग्णांवर उपचार करणार आहेत.

दरम्यान रविवार, दि. 12 जानेवारी रोजी न्यूरो सर्जन डॉ. अरिहंत पाटील व न्यूरो फिजिशियन डॉ. दीपांजली कद्दू- पाटील हे तज्ञ सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत मेंदू व मणक्याच्या आजारांबाबत रुग्ण तपासणी करणार आहेत. नसांची तपासणी व मेंदूचा आलेख यावरील उपचार अवघ्या एक हजार रुपयांमध्ये करण्याची सुविधा वर्धापन दिनानिमित्त उपलब्ध करण्यात आली आहे. डोके व मणक्याची दुखापत, मेंदूतील रक्तस्त्राव, ब्रेन ट्यूमर, मानदुखी, कंबरदुखी, हातापायांमध्ये मुंग्या येणे, फिट येणे, डोकेदुखी, चक्कर, अर्धांगवायू, स्मृतीभ्रंश, मेंदूज्वर, कंपवात, नसांचे आजार याबाबत यावेळी उपचार करण्यात येतील.

हॉस्पिटलच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या रुग्णचिकित्सा उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान गीतांजली हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांसाठी मोफत अँजिओप्लास्टीसह काही शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध आहेत याशिवाय मोफत ईसीजी व ब्लड शुगर तपासणीही उपलब्ध आहे.

वर्धापन दिनानिमित्तच्या उपचार व चिकित्सेबरोबरच नियमित औषधोपचार, एम. आर. आय., सिटीस्कॅन, मॅमोग्राफी, पॅपप्समियरची सुविधाही सिद्धनाथवाडी, वाई एसटी स्टँडजवळील गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध.

टीप : शस्त्रक्रिया, एम.आर.आय., सी.टी. स्कॅन, मॅमोग्राफी व पॅपस्मिअरसाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी 74474 26812, 74474 26816,
74474 26811 या फोन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!