अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश प्रकीया सुरु
सातारा दि. 27: सातारा येथील सैनिक स्कूल येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या इयत्ता सहावी व नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे, अशी माहिती सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन के श्रीनिवासन यांनी दिली.
दि.24 डिसेंबर पासून प्रवेश परिक्षेचे अर्ज भरणे सुरु झाले आहे. इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला-मुलींना सुवर्णसंधी असून याकरीता विद्यार्थ्याचे 31 मार्च 2025 पर्यंत 10 ते 12 वर्ष असावे. तर इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे 31 मार्च 2025 पर्यंत 13 ते 15 या दरम्यान वय असावे. सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेचे अर्ज भरण्याची मुदत 13 जानेवारी पर्यंत सायं 5 वाजेपर्यंत असून प्रवेश परिक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे अत्यंत जरुरीचे आहे. प्रवेश प्रक्रीयेबाबत अधिक माहिती साठी https://exams.nta.ac.in/AISSEE या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही प्राचार्य के श्रीनिवासन यांनी केले आहे.














