Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र

नामदार मकरंदआबा पाटील यांचे बुधवारी जिल्हयात आगमन

नामदार मकरंदआबा पाटील यांचे बुधवारी जिल्हयात आगमन
Ashok Ithape
  • PublishedDecember 24, 2024

कार्यकर्त्यांकडुन जंगी स्वागताची तयारी; प्रमोद शिंदे यांची माहिती

वाई l प्रतिनिधी : वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याने मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यानंतर बुधवार दि. 25 रोजी प्रथमच जिल्ह्यात येत असुन कार्यकर्त्यांमार्फत नामदार मकरंदआबा पाटील यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्यातील मतदारांनी मकरंदआबांवर पुन्हा विश्वास टाकत त्यांना 61 हजार मताधिक्याने निवडुण आणलेले होते. सलग 15 वर्षे आमदारकीचा अनुभव असलेले व सर्वसामान्यांच्या हृदयातील आपला वाटणारा माणुस म्हणून आमदार मकरंदआबांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विश्वास टाकत मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिलेले आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणुन निवड झालेनंतर सातारा जिल्ह्यात बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी प्रथमच आगमन होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये स्फुर्तीदायी वातावरण निर्माण झालेले आहे.

शिंदेवाडी येथे सकाळी 9 वाजता आगमन होणार असुन तेथे स्वागत केले जाईल. तदनंतर स. 9.15 वा. शिरवळ, 9.50 वा. नायगांव, 10.30 वा. खंडाळा, 11.00 वा. वेळे, 11.30 वा. सुरूर, 11.45 वा. कवठे, दुपारी 12.05 वा. बोपेगांव, 12.30 वा. जोशीविहिर, 12.45 वा. भुईंज, 1.15 वा. पाचवड, 1.45 वा. उडतरे, 2.00 वा. विरमाडे, 2.15 वा. मर्दै फाटा, 2.30 वा. लिंब फाटा, 2.50 वा. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथे, 3.50 वा. नागठाणे, सायं. 4.10 वा. काशिळ, 4.30 वा. उंब्रज, 5.00 वा. कराड शहरात आगमन तर सायं. 5.30 वा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर आगमन व अभिवादन करणार असल्याची माहिती दिलेली आहे.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नामदार मकरंदआबा पाटील यांच्या स्वागतासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!