“उत्कर्ष श्री ” वाई फेस्टिवल च्या मंचावर : फिटनेस, ताकद व सौंदर्याचा अनोखा संगम
वाई l प्रतिनिधी :

वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा २० डिसेंबर २०२४ रोजी महागणपती घाटावर संपन्न झाली. वाई फेस्टिवल चे जरी हे १७ वे वर्ष असले तरी, कै आनंद कोल्हापुरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या “उत्कर्ष श्री ” या शरीर सौष्ठव स्पर्धेचे हे २४ वे वर्ष असून तरुणांमध्ये व्यायामाची ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने सुरु केलेली हि स्पर्धा अखंडित सुरु आहे. ६ वजनी गटात झालेल्या स्पर्धेमध्ये मानाचा उत्कर्ष श्री हा किताब वाई जिमखान्याचा खेळाडू ज्ञानेश्वर अन्कोशी याने पटकावला तर मेन्स फिजिक हा किताब कराड चा सियाल शेख याने पटकाविला.
गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे मेडल्स व सर्टिफिकिट देण्यात आले. उत्कर्ष श्री हि स्पर्धा सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा असून, “ उत्कर्ष श्री ” हा किताब वाई जिमखान्यातील खेळाडूने पटकवावा अशी वाई संस्थापक स्व आनंद कोल्हापुरे यांची इच्छा यावर्षी पूर्ण झाल्याचे समाधान वाई जिमखाना चे सर्व अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांना वाटले. यामुळे खऱ्या अर्थाने संस्थापक यांना आदरांजली मिळाल्याचे देखील फेस्टिवलचे निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या स्पर्धेचे उद्घाटन वाई तालुक्याचे पोलीस उपाधीक्षक श्री शाम पानेगावकर सो यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्तम शरीरयष्टी असलेल्या वाई मधील पोलीस श्री राम कोळी यांचा सन्मान वाई फेस्टिवल च्या व्यासपीठावर करण्यात आला. याप्रसंगी वाई मधील पोलीस श्री धीरज नेवसे यांचा देखील सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे गेस्ट वुमेन पोजर मा दीपा सप्रे व मा शीतल वाडेकर. महिला या क्षेत्रातही किती सरस आहेत, हे त्यांनी त्यांच्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवले. प्रेक्षकांना फिटनेस, ताकद व सौंदर्याचा एक अनोखा मिलाप या व्यासपीठावर बघायला मिळाला.
स्पर्धेला एक नवी उंची दिल्याबद्दल राष्ट्रीय पंच राजेंद्र हेंद्रे व चंदू पवार यांनी अमर कोल्हापुरे यांचे विशेष कौतुक केले. स्पर्धेसाठी पंच म्हणून मुरली वत्स, नितीन माने, मिथिल भंडारी, अजित सांडगे ,अनिल फुले, फैय्याज बागवान यांनी तर स्टेजमार्शल म्हणून अमोल ननवरे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत ५० ते ५५ वजनी गटात प्रथम क्रमांक श्री सुरज नेवसे, द्वितीय क्रमांक श्री राजेंद्र यादव, तृतीय क्रमांक श्री प्रथमेश भिसे, चतुर्थ क्रमांक श्री सागर ढेबे, पाचवा क्रमांक विनीत नेमाडे, ५५ ते ६० वजनी गटात प्रथम क्रमांक श्री सुमित येवले, द्वितीय क्रमांक श्री प्रताप ठाकूर, तृतीय क्रमांक श्री शुभम वाडेकर, चतुर्थ क्रमांक श्री उदय शिंदे, पाचवा क्रमांक श्री विश्वजित हिणगुले, ६० ते ६५ वजनी गटात प्रथम क्रमांक श्रीसचिन जमदाडे , द्वितीय क्रमांक श्री लक्ष्मण घोडके , तृतीय क्रमांक श्री श्रीकांत भोईटे, चतुर्थ क्रमांक श्रीरामा मैनाक , पाचवा क्रमांक श्री अनिकेत लोहार, ६५ ते ७० वजनी गटात प्रथम क्रमांक श्रीज्ञानेश्वर अंकोशी, द्वितीय क्रमांक श्री विजय यादव, तृतीय क्रमांक श्री अनिल जाधव, चतुर्थ क्रमांक श्री शुभम जमादार, पाचवा क्रमांक आकाश गाडे, ७० ते ७५ वजनी गटात प्रथम क्रमांक श्री अजिंक्य महामुनी, द्वितीय क्रमांक श्री सुलेमान मोमीन, तृतीय क्रमांक श्री अमित शहा, चतुर्थ क्रमांक श्री सनी भोसले , पाचवा क्रमांक श्री रोहित पाटील, खुल्या गटात प्रथम क्रमांक श्री रोहित गजरे, द्वितीय क्रमांक श्रीसलमान शेख, तृतीय क्रमांक श्री तन्वीर सय्यद, चतुर्थ क्रमांक श्री अक्षय काकडे , पाचवा क्रमांक श्री गौरव उंबरकर याने पटकावला. तसेच मेन्स फिजीक या गटात प्रथम क्रमांक श्री सियाल शेख , द्वितीय क्रमांक श्री विजय लोहार, तृतीय क्रमांक प्रथमेश चोरगे, चतुर्थ क्रमांक श्री आयुष ओसवाल, पाचवा क्रमांक श्री प्रशांत फणसे यांनी यश मिळवले.
स्व आनंद कोल्हापुरे यांनी त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या नेत्रदानाच्या संकल्पनेत सहभागी झालेले वाई मधील डॉ विठ्ठल भोईटे , श्री काशिनाथ शेलार , श्री संदीप गुळूंबकर, श्री सतीश पाटणे, ॲड अमित देशमाने, श्री श्रीकांत चव्हाण , श्री आशिष पाटणे , श्री प्रल्हाद चावरे , श्री अनिल चव्हाण , श्री अनिल गोळे , श्री आशिष सकुंडे , श्री अतुल भाटे, श्री संदीप शिंदे, श्री अमर सुतार , श्री प्रशांत चिटणीस व इतर मान्यवर श्री अक्षय आरडे , श्री रणवीर गायकवाड , श्री दिनेश खैरे , श्री अनिकेत वाईकर, श्री तेजस जमदाडे , श्री विशाल मोरे , श्री तुषार जगताप , श्री मयूर कारळे , श्री चिराल चव्हाण , श्री संदेश कणसे, श्री सलीम शेख , श्री प्रमोद अनपट , श्री संदीप जावळे , श्री सचिन अनपट , श्री ओमकार सूर्यवंशी , श्री सचिन शिंदे , श्री प्रथमेश कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाई फेस्टिवलचे अध्यक्ष श्री शरद चव्हाण, कोषाध्यक्ष adv रमेश यादव व सचिव श्री सुनील शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी फेस्टिवल चे समिती सदस्य श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, श्री मदन साळवेकर , श्री श्रीकांत शिंदे , श्री सलीमभाई बागवान , श्री संजय वाईकर , श्री सागर मुळे , श्री वैभव फुले , श्री भूषण तारू , श्री शैलेंद्र गोखले , श्री अमीर बागुल , सौ प्रीती कोल्हापुरे , श्री नितीन वाघचौडे , श्री तुकाराम जेधे , श्रीमती नीला कुलकर्णी , श्रीमती अलका घाडगे, श्री प्रशांत मांढरे , श्री प्रणव गुजर , श्री निखिल चव्हाण , श्री नितीन शिंदे , श्री ओंकार सपकाळ व उत्कर्ष पतसंस्थेचे कर्मचारी हे उपस्थित होते.













