Mon, Mar 2, 2026
क्रीडा

कोल्हापूर विभागीय डाॅजबाॅल स्पर्धेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचा संघ विजयी.

कोल्हापूर विभागीय डाॅजबाॅल स्पर्धेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचा संघ विजयी.
Ashok Ithape
  • PublishedDecember 21, 2024

या संघाची राज्यस्तरावर निवड

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने कोल्हापूर ,सांगली आदी बलाढ्य संघाला हरवून विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धा लोणंद जि. सातारा येथे नुकत्याच पार पडल्या.

डाॅजबाॅल या क्रिडा प्रकाराच्या स्पर्धेत अंतरा वरवटकर,प्रिया अजगोलकर,अंतरा डोर्लेकर,ऋतुजा डोर्लेकर, रिया पावस्कर,नंदिनी जाधव,अन्वया पावरी,धनश्री बळकटे, सई पावरी,अक्षरा झर्वे या सहभागी झाल्या होत्या.या संघास क्रीडा शिक्षिका ऋतुजा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या स्पर्धेत सलग तीन विजय मिळवत दि मॉडेल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने,तसेच मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थीनीचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन केले.तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतही हा संघ उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करेल असा विश्वास व्यक्त केला.

प्रशालेस संस्था,पालक यांचे चांगले सहकार्य, क्रीडा शिक्षकांचे सतत दर्जेदार मार्गदर्शन आणि विद्यार्थीनींनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश आंम्ही मिळवू शकलो,असेही श्री कोळेकर यांनी स्पष्ट केले. सर्व यशस्वी संघावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!