राष्ट्रीय गणित दिवसा निमित्त वाई येथे सुंदर गणित रंजक गणित या विषयावर नागेश मोने यांच्या व्याख्यानाचे आयोजन.
वाई l प्रतिनिधी
भारताचे थोर गणित शास्त्रज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिना निमित्त दिनांक 22डिसेंबर 2024 हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्य साधून लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई व वाई तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सुंदर गणित रंजक गणित या व्याख्यानाचे आयोजन लोकमान्य टिळक ग्रंथालय याचे रमेश गरवारे सभागृह येथे सायंकाळी सहा ते सात या वेळेत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे व्याख्याते नागेश शंकर मोने सर, निवृत्त मुख्याध्यापक द्रविड हायस्कूल वाई हे असणार आहेत. ज्यांना गणित विषयांमध्ये रस आहे, किंवा ज्यांना गणित विषयांमध्ये रस उत्पन्न व्हावा असे वाटते अशा समाजातील विविध घटकांसाठी हे व्याख्यान उपयुक्त होऊ शकते. पुस्तक व पुस्तिका यांचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी होणार आहे. उपस्थित सर्वांनाच एक भेटवस्तू दिली जाणार आहे त्यामुळे वाईकरांनी या व्याख्यानास उपस्थित रहावे व आपले गणित विषयाचे ज्ञान वृद्धिंगत करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.













