Mon, Mar 2, 2026
सामाजिक

कोरेगांव तालुक्यात मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आढळलेल्या नोदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

कोरेगांव तालुक्यात मराठा-कुणबी, कुणबी-मराठा   आढळलेल्या नोदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
Ashok Ithape
  • PublishedDecember 21, 2024

सातारा, दि. 20 : कोरेगांव तालुक्यात मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देणेसाठी अधिनस्त कार्यालयामध्ये सदर नोंदीचे अभिलेख तपासणी करून ज्या अभिलेख्यानुसासर नोंदी आढळल्या आहेत. त्याची यादी https://drive.google.com/drive/folders/1bL-Kk9TivnD- DQxJAWD1dk8eouXpbwwt?usp=sharing या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत आली आहे, अशी माहिती कोरेगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक यांनी दिली आहे.

  कोरेगांव तालुक्यामध्ये, ज्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे दाखला उपविभागीय अधिकारी कार्यालय कोरेगांव उपविभाग कोरेगांव कार्यालयातून काढावाचे आहेत  त्यांनी आवश्यक पुराव्याच्या अभिलेखासह अर्ज, सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय, कोरेगांव येथे दाखल करावेत. त्याप्रमाणे दाखला वितरीत करणेची कार्यवाही करण्यात येईल, असे   उपविभागीय अधिकारी श्री. नाईक यांनी कळविले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!