Thu, Jan 15, 2026
नोकरी मार्गदर्शन

करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोन

करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोन
Ashok Ithape
  • PublishedDecember 19, 2024
पालकांसह विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन
सातारा, दि. 19 : विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होऊन त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस योग्य दिशा मिळावी यासाठी   शिक्षण विभाग जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 जानेवारी 2025 या कालवधीत यशोदा टेक्नीकल कॅम्प, सातारा येथे करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पालकांसह विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील इयत्ता नववी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ताणतणाव, परीक्षा, व्यवसाय, नोकरी यासंबंधी तज्ञ मार्गदर्शकांद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच दहावी व बारावीनंतरच्या करिअरच्या संधी, महाकरिअर पोर्टल, कला-वाणिज्य विज्ञान या क्षेत्रातील नोकरी व व्यवसायाच्या संधी, शासनाच्या विविध योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व व मार्केटिंग या विषयावर सखोल मार्गदर्शन व चर्चा सत्राचेही आयोजन करण्यात येणार आहे.  इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या व १८ वर्षे पूर्ण केलेल्या गरजू व कौशल्य प्राप्त उमेदवारांना करिअरचे विविध स्रोत आणि नोकरीच्या संधी देखील या मेळाव्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या मेळाव्यामध्ये संगणक व तंत्रज्ञानात्मक विविध अभ्यासक्रम व त्यावर आधारित प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची व माहिती मिळवण्याची संधी मिळणार आहे. तरी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी 1 व 2 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या करिअर मेळाव्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!