Mon, Mar 2, 2026
शिक्षण

जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा 2024 चा निकाल घोषित

जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा 2024 चा निकाल घोषित
Ashok Ithape
  • PublishedDecember 17, 2024

सातारा दि. 17: जी. डी. सी. ॲन्ड ए. बोर्ड मार्फत मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा 2024 चा निकाल घोषित करण्यात आलेला आहे अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक, संजयकुमार सुद्रीक यांनी दिली.

हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परिक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्ड वापरून पाहता येईल. तसेच पीडीएफ फॉरमॅटमध्ये https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए. मंडळ” येथे पहावयास उपलब्ध राहील. फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थींना दिनांक 5 जानेवारी 2025 पर्यंत रात्री

साडेदहापर्यंत  https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर परिक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्डचा वापर करून अर्ज करता येईल.  फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थी यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बॅंक बॅंकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी फी रू.75 व बॅंक चार्जेस याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बॅंकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत 5 जानेवारी 2024 पर्यंत राहील. सदर चलन बॅंकेत  दिनांक 08 जानेवारी 2025 पर्यंत भरणा करावे. विहीत तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही. तरी सदर परिक्षार्थीनी याची कृपया नोंद घेण्याचे कळविण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!