Thu, Jan 15, 2026
Media

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे राज्य संमेलनाचे नागपूर येथे आयोजन

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे राज्य संमेलनाचे नागपूर येथे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedDecember 14, 2024
१५ मान्यवरांचा आदर्श पत्रकार व प्रेरणा पुरस्काराने होणार सन्मान
कराड / प्रतिनिधी : – ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्रचे १९ वे राज्य संमेलन नागपूर येथे रविवार, दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनास सर्व पदाधिकारी सदस्य पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन, संमेलनाचे निमंत्रक ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्रचे प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, राज्य संपर्कप्रमुख अरविंद जाधव व    संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्रचे १९ वे राज्य संमेलन नागपूर येथे रविवार, दि.१५ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत प्रेस क्लब, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाची रूपरेषा पुढीलप्रमाणे, पहिल्या सत्रात सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार असून ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल, महाराष्ट्रचे विश्वस्त अतुल होनकळसे हे स्वागत व प्रास्ताविक करणार आहोत. संमेलनाचे उद्घाटक प्रेस क्लब, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, समारंभ अध्यक्ष एजेएफसीचे केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय खबसे (नागपूर), डिजिटल मिडिया अभ्यासक देवनार गडाते (नागपूर), बरिष्ठ पत्रकार, पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू लॉडे असणार आहेत. या सत्रात माझी पत्रकारिता या विषयावर दुपारी ११.३० ते दुपारी १२.३० यावेळी १० पत्रकारांचे आत्मकथन सादर करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात दुपारी १२.३० ते दुपारी २ वेळेत आजची पत्रकारिता व आम्ही या विषयावर समारंभाचे अध्यक्ष दिनकरराव पतंगे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे (नागपूर), ज्येष्ठ पत्रकार गणेश गोडसे (बार्शी सोलापूर), ज्येष्ठ पत्रकार निलेश पोटे (अकोट अकोला), ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल मोघे (दौड पुणे), ज्येष्ठ पत्रकार दिपक नागरे (सिंदखेड, राजा बुलढाणा) उपस्थित राहणार आहेत.
तिसऱ्या सूत्रात दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत संघटनेचे ठराव आणि गौरव समारंभ होणार आहे. यावेळी राज्यभरातील १५ पत्रकार आणि सन्माननीय व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यात आदर्श पत्रकार म्हणून संतोष पुरी (परभणी), विजय खवसे (नागपूर), अमरसिंग परदेशी (पुणे), बाळासाहेब इंगळे (अकोला), श्रीकांत बाविस्कर (अकोला), सुरेखा पतंगे (सांगली), रवींद्र फोलाने (बुलडाणा), दौलत भोसले (परभणी) विशाल बोरे (अकोला) नौशाद शेख अब्बास (बुलढाणा) संतोष खुणे (धाराशिव) यांना गौरविण्यात येणार आहे. तर प्रशांत कदम (सातारा) राहुल ढवन (अहिल्यानगर) चंद्रकांत पष्टे (ठाणे) सुरेखा पतंगे (सांगली) यांना प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या समारंभाचे प्रमुख अध्यक्ष एजेएफसी संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल असणार आहेत. या सत्रात राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, विश्वस्त अतुल होनकळसे, केंद्रीय खजिनदार सत्यवान विचारे, मुंबई अध्यक्ष निसार सय्यद आणि एजेएफसीचे सर्वप्रमुख केंद्रीय व राज्य पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!