पुणे जिल्हा युवा महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, 6 डिसेंबर 2024

नेहरू युवा केंद्र पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय एकदिवसीय युवा महोत्सव गुरुवारी संपन्न झाला. आबेदा इनामदार जुनियर कॉलेज पुणे, पुना कॉलेज आर्ट, सायन्स अँड कॉमर्स, चॉइस कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना यांनी कार्यक्रम आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
“पुणे जिल्ह्याला पारंपरिक लोक कलेचा वारसा लाभलेला आहे. युवक-युवतींनी शालेय शिक्षणाबरोबर विविध कला आत्मसात करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात अनेकांनी आपल्या कला सादर केल्या. अशा महोत्सवांमध्ये तरुणांनी आपली कला सादर करुन आपल्या पारंपारिक कलेची जोपासना करण्याचे आवाहन” कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी हितेंद्र सोमणी यांनी युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले.
या वर्षी युवा महोत्सव विज्ञान आणि तंत्रज्ञान या थिमवर आधारित आयोजित करण्यात आला होता. त्याप्रमाणे सर्व विषय पारंपारिक व विज्ञानाची जोड विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार्या कृती या युवा या युवा महोत्सवांमधून युवकांनी आपल्या कलेतून सादर केल्या. यामध्ये विज्ञान प्रदर्शन मेळा, समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, कथालेखन, कविता लेखन, चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मान्य वरांच्या उपस्थितित या स्पर्धकांना रोख पारितोषक, स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. समारोपप्रसंगी पारितोषक वितरण करण्यात आले. या युवा महोत्सवात विविध स्पर्धकांनी आपली कला सादर केली. विविध कला प्रकारामध्ये पार पडलेल्या स्पर्धा मध्ये विजेत्या ठरलेल्या प्रथम, द्वितीय स्पर्धकांना विभाग स्तरावर प्रतिनिधित्व साठी पाठविण्यात येणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात स्पर्धक युवक-युवती , शाळा महाविद्यालय, युवा मंडळ, बचत गटातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. याप्रसंगी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी डॉ. आफतब अन्वर शेख, ताहेर आसी, क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशिष शेटे, सहायक क्रीडा अधिकारी पुणे दादा देवकाते, अभिनव कॉलेजचे प्राचार्य राहुल बळवंत, इनामदार कॉलेजचे प्राचार्य इनामदार आदीचं मन्यारासह कार्यक्रमाचे परीक्षक, युवक-युवती यांच्या प्रमुख उपस्थितित मोठ्या उत्साहात पार पडला.
विविध स्पर्धांमधील पारितोषिक वितरण:
समूह लोकनृत्य – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती (प्रथम), अहिल्यादेवी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पुणे (द्वितीय)
लोकगीत ग्रुप – शारदा नगर संगीत विद्यालय बारामती (प्रथम), तुळजाराम चतुर चंद्र महाविद्यालय बारामती (द्वितीय)
वक्तृत्व स्पर्धा – अनुष्का बॅनर्जी (प्रथम), यश चव्हाण (द्वितीय)
चित्रकला स्पर्धा – विशाखा रवींद्र धर्मी(प्रथम), रुची मुकेश पटेल (द्वितीय)
कविता लेखन स्पर्धा – तमन्ना शेख (प्रथम), महेक इनामदार (द्वितीय)
कथालेखन स्पर्धा – महेक इनामदार (प्रथम), तमन्ना सिकंदर शेख(द्वितीय)
विज्ञान प्रदर्शन – वसंत धनंजय जगताप(प्रथम), सोहम संत(द्वितीय).













