Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

रब्बी हंगाम पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा कृषी विभागाचे आवाहन

रब्बी हंगाम पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा कृषी विभागाचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedDecember 2, 2024
सातारा, दि.2 : कृषी विभागामार्फत रब्बी हगांम सन २०२४ -२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी,गहु,हरभरा,करडई व जवस या पाच पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे जमिन असणे आवश्यक असून तो स्वत: कसत असावा. या स्पर्धेत सहभागी शेतकऱ्याच्या स्वता:च्या शेतावर किमान ४० आर क्षेत्रावर लागवढ असणे आावश्यक आहे तसेच शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल.
शेतकऱ्यांनी विहीत नमुण्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२ व ८ अ चा उतारा, जातप्रमाणपत्र(आदिवासी असल्यास) बँक पासबुक व ७/१२ वर घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडून आपला अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सादर करावा. पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी सपंर्क साधावा.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!