Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

वाई तालुक्यात महास्वच्छता मोहीम राबविण्यात यश

वाई तालुक्यात महास्वच्छता मोहीम राबविण्यात यश
Ashok Ithape
  • PublishedNovember 26, 2024

गावाच्या स्वच्छतेसाठी हजारो हात पुढे सरसावले

वाई : जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती वाई याच्या संयुक्त विद्यमानाने दि .26 नोव्हेंबर रोजी एक दिवस घरकुल व गावच्या स्वच्छतेसाठी हा एकदिवसीय नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण वाई तालुक्यात राबविण्यात आला.

स्वच्छ भारत मिशन हे अभियान देशपातळीवर अत्यंत प्रभावी पणे राबविण्यात येत आहे .या मध्ये ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान उंचविण्याकरिता वैयक्तिक शोउचलाय बांधकाम पूर्ण करून गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली त्याच धरतीवर स्वच्छ भारत मिशन टप्पा -2 मध्ये गावामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक व्यस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प बांधकाम पूर्ण करण्याचे कामे वेगाने सुरु आहेत परंतु लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यांना वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छतेची आवड निर्माण होणेसाठी जनजागृती करणे आवश्यक आहे त्याकरिता सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन , अर्चना वाघमळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं ), प्रज्ञा माने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता )जि .प .सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुक्यात विविध उपक्रम यशस्वी राबविण्यात येतात.

नुकताच वाई चषक स्पर्धा 2024 हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला त्याच धरतीवर वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये *एक दिवस घरकुल व गावच्या स्वच्छतेसाठी* हा उपक्रम राबविण्यात आला . याकरिता वाई पंचायत समिती मधील सर्व खाते प्रमुख, अधिकारी , अधिकारी व कर्मचारी यांना वाई तालुक्यातील 99 गावांना संपर्क अधिकारी यांची निवड करण्यात आली.

त्यांच्या मार्फत गावातील मंजूर असलेली घरकुले ज्यांची कामे सुरु नाहीत अशी घरकुलाची कामे सुरु करणे, संविधान दिनानिमित्त संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करणे, स्वच्छतेची शपथ घेणे तसेच गावातील ग्रामस्थ, युवामंडळे आणि लोकसहभागातून गावातील कचरा पडणाऱ्या सार्वजनिक ठिकाणे, मंदिर परिसर ,वाड्या वस्ती , गल्ली बोलतील ठिकाणे स्वच्छ करणे, पाणी स्रोत, नदीपात्र जवळील ठिकाणे,पंप हाऊस, गटारे स्वच्छ करणे,औषध फवारणी करणे , सार्वजनिक शोउचलायची स्वच्छता करणे, सार्वजनिक भिंती स्वच्छ करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रंगविणे, तसेच ओला व सुका कचरा वेगळा करणे साठी गृहभेटी देऊन जन जागृती करणे , एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जन जागृती करणे आणि प्लास्टिक पिशव्या विक्रतेवर दंडात्मक कारवाई करणे हे उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमाला सर्व गावातून खूप मोठ्या संख्येने चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी  पंचायत समिती वाई गटविकास अधिकारी श्री विजयकुमार परीट यांनी वाई तालुक्यातील गावे कचरामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावासाठी श्रमदान करावे असे आवाहन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!