Mon, Mar 2, 2026
क्रीडा

भुईंजच्या कर्मवीर विद्यालयातील संचिता बाबरला राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक

भुईंजच्या कर्मवीर विद्यालयातील संचिता बाबरला राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक
Ashok Ithape
  • PublishedNovember 21, 2024

गेल्या तीन वर्षात धनुर्विद्या या खेळात राज्य पातळीवर संचिता हिने एक सुवर्ण, दोन रोप्य व दोन कांस्यपदके मिळवली आहेत.

वाई – भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता- आठवीतील विद्यार्थिनी संचिता सुनील बाबर हिने गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

संचिता ही भुईंजमधील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. सुनील बाबर यांची कन्या असून शासकीय, शालेय, विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये प्रशिक्षक श्री प्रणित सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तिने उज्वल यश संपादन केले आहे.

ग्रामीण भागात फारशा सुविधा नसतानाही धनुर्विद्या या खेळाचा गेले तीन वर्ष ती सराव करीत आहे त्यामुळेच तिने धनुर्विद्या क्रीडा प्रकारात संपादन केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.
गुजरातमधील नाडियाड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संचिताने मिळवलेल्या यशाबद्दल विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!