सातारा जिल्ह्यातील मान्यवरांचा पनवेल येथे गौरव
वाई दि. 31 – महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे वतीने प्राईड आॅफ महाराष्ट्र या पुरस्काराने सातारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा पनवेल येथे एका शानदार समारंभात धरणग्रस्त कृती समिती व श्रमिक मुक्ती दलाचे शेतकरी नेते डाॅ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली वाईतील ज्येष्ठ साहित्यिक व नामवंत विधीज्ञ अॅड. उमेश सणस, रोहा नगरपरिषदेचे गट नेते महेंद्र गुजर, लाईफ लाईनचे संचालक पराग बेडसे, बाळानंदजी कोंडार आदी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
त्यामध्ये सातारा येथील दिशा डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ कैलास खडतरे, वाईतील नामवंत डॉ. सतीश बाबर यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला बाजीराव बाबर, वेळे येथील प्रसिद्ध वैद्यक व्यावसायिक डॉ.अनिलकुमार पांडुरंग शिंगटे आदींचा यामध्ये समावेश आहे.
पनवेल येथे महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने २० वा प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार कार्यक्रमात डॉ. भारत पाटणकर,अॅड उमेश सणस व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थींना गौरवण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले की ग्रामीण भागातील स्त्रियांच्या योगदानामुळे अद्यापही शेती व्यवसाय टिकून आहे ग्रामीण भागातले पुरुष लोक महिलांच्या जीवावरच शेती करतात महिलांमुळेच आपल्याला दोन वेळचे अन्न मिळत आहे त्यामुळे त्यांचे कष्ट व योगदान कदापीही विसरता येणार नाही. अलीकडे शहरी भागांमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजाने महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
अॅड. उमेश सणस म्हणाले, रायगड जिल्हा आहे शिवछत्रपतींची कर्मभूमी आहे या ठिकाणी राज्यातील मान्यवरांचा गौरव होतो आहे ही कौतुकास्पद बाब आहे महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय मर्ढेकर यांच्या माध्यमातून समाजाच्या विविध स्तरात काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे पुरस्कारामुळे त्यांना अधिक क्षमतेने काम करण्याची उर्मी मिळते.
याप्रसंगी विवेक गुरव व विविध मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमात जयश्री वैरागी, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, प्राचार्या सौ रंजना चंद्रमोरे, शशिकांत कापसे (कोल्हापूर), अरविंद पोतदार, नलिनी पोतदार, शुभम महामुनी, पांडुरंग पवार, पत्रकार शशिकांत मोरे, रुचिका जैन, बाळकृष्ण सबनीस, रिया तलाठी, नेत्रा मेहता, मोनिका भूतकर, विवेक गुरव, रामचंद्र नामदाडे, जालिंदर काकडे, प्रशांत भागवत, बाबासाहेब सानप, सुभाष यादव, रोहिणी कांबळे, वैशाली नलवडे, पंकज मोरे, रोहित मिटके यांना गौरविण्यात आले.
फौंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय मर्ढेकर, सौ. मनीषा लोहार व फौंडेशनच्या कार्यकर्ते यांनी स्वागत केले. अॅड. प्राजक्ता लोहार यांनी सूत्रसंचालन केले. दगडू माने यांनी आभार मानले. यावेळी दीपावली निमित्त विशेष गौरव विकास विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.













