Tue, Mar 3, 2026
राजकीय बातमीपत्र

आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावली विधानसभा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल.

आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावली विधानसभा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल.
Ashok Ithape
  • PublishedOctober 28, 2024

सातारा : भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट), आरपीआय (आठवले गट) आणि महायुतीतील सर्व मित्र पक्ष यांचा अधिकृत उमेदवार म्हणूनआमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांनी सातारा- जावली विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान, राजवाडा ते पोवई नाका अशी भव्यदिव्य महारॅली काढण्यात आली.

या रॅलीत सातारा शहर, सातारा तालुका आणि जावली तालुक्यातील अबालवृद्ध, माता- भगिनी, युवा मित्र, हजारो कार्यकर्ते जनता हजारोंच्या संख्येने सहभागी झाली. पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . अर्ज दाखल करण्यासाठी खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांचे आजी- माजी पदाधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा व जावली पंचायत समितीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी- नगरसेवक, महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!