बावधन ता. वाई येथील डॉ. जनार्दन भोसले यांना “युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार २०२४” जाहीर
वाई : युवा प्रबोधन साहित्य मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात
बावधन ता वाई येथील साहित्यिक, पत्रकार डॉ जनार्दन भोसले यांनी शैक्षणिक, सामाजिक , साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कर्तृत्व या साठी “युवा महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार २०२४ ” जाहीर झाल्याचे युवा प्रबोधन साहित्य मंच चे संस्थापक अध्यक्ष सागर भाऊ वाघमारे आणि रितेश वाघमारे यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातुन कलाकार साहित्यिकांची निवड केली आहे.
या आगोदर साहित्यिक डॉ जनार्दन भोसले यांना १५ राज्यस्तरीय पुरस्कार, २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
या निवडी बद्दल रात्रीस खेळ चाले या मालिकेतील आण्णा नाईक भूमिका करणारे सिनेअभिनेते माधव अभंकर , रिसर्व्ह बँकेचे मुख्य संचालक डॉ आशितोष रारावीकर,गुप्तचर अधिकारी श्री संतोष देसाई , प्राचार्य डॉ राजेंद्र थोरात, साहित्यिक लक्ष्मीकांत रांजणे, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव श्री शिवाजी शिंदे , तसेच साहित्यिक, सामाजिक शैक्षणिक, पत्रकार ,मित्र परिवार, या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
तळेगाव ता मावळ, जि पुणे येथे २४ नोव्हेंबर २०२४ ला हा पुरस्कार वितरण समारंभात सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण होणार आहे.













