Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र

जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार मताधिक्याने निवडून येतील

जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार मताधिक्याने निवडून येतील
Ashok Ithape
  • PublishedOctober 18, 2024

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रतिपादन

सातारा / प्रतिनिधी – निवडणूक आली की अनेक भावी आमदार पुढे येतात व मिरवतात, अशी टीका करून महायुतीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा व जावली तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची आज ‘सुरुची’मध्ये बैठक झाली. निवडणुकीबाबतचे नियोजन व दिशा आखण्यासाठी हे बैठक होती, असे सांगून मतदार संघातील प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर आपला संपर्क आहे. तेथील प्रत्येक नागरिकांसाठी आपण कामे केली आहेत.

याशिवाय शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात आणि त्या जनतेपर्यंत पोहोचण्यात मी व माझ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे माझ्या कामाची पोचपावती मतदार मला देतील याची खात्री आहे. मी केवळ निवडणूक आली म्हणून जनतेसमोर जात नाही, तर गेली पाच वर्षे दररोज जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या वाडीवस्तीपर्यंत जात असतो.‌

आजवर केलेल्या विकासकामांची जनतेला माहिती आहेच, मात्र केवळ त्याची आठवण करून देणे व मत देण्यासाठी मतदारांना आवाहन करणे, हीच निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार मोहीम असते. सातारा व जावली तालुक्यातील जनतेला मी केलेल्या विकासकामांची जाणीव आहे, त्यामुळे मला मतदारराजा मताधिक्य देईल, अशी खात्री वाटते.

निवडणूक जाहीर होताच काही व्यक्ती स्वतःची ‘भावी आमदार’ अशी फलकबाजी करतात. जर त्यांनी स्वतःस आमदार म्हणून घोषित केले असेल तर, जनतेच्या मतांची त्यांना काहीच गरज नाही, असे स्पष्ट होते. अशी टीकाही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
दरम्यान जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा अंदाजही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!