विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी वाईच्या शार्दूल भिलारेची निवड
वाई / प्रतिनिधी : वाईच्या नॅशनल पब्लिक स्कूलमधील शार्दुल जितेंद्र भिलारे या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील यशातून त्याची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.
शार्दूल भिलारे हा विद्यार्थी बुद्धिबळ क्रीडा प्रकारात प्रवीण असून मुधोजी क्लब फलटण व केया युथ संस्था वाई येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्येही त्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे .
या यशाबद्दल संचालक श्री. रोहिदास (बापू) पिसाळ, श्री. सचिन सावंत (इंद्रजा डेव्हलपर्स, वाई) मुख्याध्यापक श्री. कमलाकर पाठक उपमुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री जाधव क्रीडा शिक्षिका सौ. पूजा वाघ, सौ. पद्मा भिलारे, श्री प्रवीण वाघ मुख्याध्यापक जॉय चिल्ड्रन अकॅडमी वाई व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













