दमदार आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
![]()
विनोद कुलकर्णी व हरीष पाटणे तुमचे खूप खूप अभिनंदन..

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. मराठी साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्रातील एकमेव भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप’चे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सातारकरांनी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केले.
साताऱ्यातून एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात आली होती. गेले सहा वर्ष सातारकर आणि छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप’चे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सतत पाठपुरावा करत होते. आज सर्वांच्या प्रयत्नांना मोठे यश लाभले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा मराठी भाषा आणि मराठी भाषिकांसाठी अत्यंत गौरवास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मंडळाचे विशेष आभार.













