सायली जवळकोटे यांचे निधन
![]()
सोमवारी दोन वाजता सोलापुरात अंत्यसंस्कार
सातारा / प्रतिनिधी : दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्री. सचिन जवळकोटे यांच्या पत्नी व सोलापूर येथील प्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे ( वय 54 ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी 2 वाजता सोलापूर येथील वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपभावानी रोड येथे होणार आहे.त्यांनी आजपर्यंत संचार, लोकमतसाठी लिखाण केले. आकाशवाणी अन् आजतक चॅनेलसाठीही काम केले. संपादक सचिन जवळकोटे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि पत्रकारितेतील वाटचालीत त्यांचे मोठे योगदान होते.
साताऱ्यातील वास्त्यव्यात त्या येथील सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्व अशीही त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे आहेत.













