सातारच्या मिठालालच्या पालक पुरीची ‘मेजवानी’.. पुण्याच्या लावण्यावती ‘अप्सरेचा’ ठसका..!
![]()
अजिंक्यतारा गणेश मंडळाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा.. सोहळा झाला सदाबहार आणि नेटका..!!
भुईंज :- महेंद्रआबा जाधवराव
अजिंक्यतारा साखर कारखाना कामगार गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमानंतर प्रसिद्ध केटरर्स मिठालाल यांच्या स्नेहभोजन मेजवानीचा मनसोक्त आस्वाद तर पुण्याची अप्सरा सिनेतारीका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांच्या सदाबहार कार्यक्रमचा आनंद अधिकारी – कामगार यांनी लुटाला.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर याहीवर्षी
मा. आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, (महाराजसाहेब) व मा. श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले, (बहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते, चेअरमन मा.श्री. यशवंत साळुंखे अध्यक्ष व मा. संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
दरम्यान शुक्रवारी श्री. सत्यनारायणाची महापूजा व महिलासाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सातारा येथील प्रसिद्ध केटररर्स मिठालाल यांच्या पालक पुरीची मेजवानी व कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते साहेब यांनी पुरस्कृत केलेल्या गोड लापसीवर सर्वांनी ताव मारला.
दुपारी सिनेतारीका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांचा लक्ष्मी प्रोडक्शन पुणे निर्मित अप्सरा आली, (सुत्रधार गिरीज महाजन) या बहारदार कार्यक्रमाचा शुभारंभ
कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, कारखान्याचे संचालक भास्करराव घोरपडे व मंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव,कामगार युनियनचे अध्यक्ष कृष्णात धनवे, पोळ साहेब, धायगुडे साहेब, दिग्विजय पाटील साहेब, दिनेश चव्हाण साहेब, सयाजीराव पाटील, राजाराम कणसे, संजीवन कदम, प्रमोद कुंभार साहेब, माजी कामगार संचालक नितीन भोसले तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित झाला. लावण्यवती अर्चना सावंत व सहकलाकारांनी सादर केलेल्या लावण्या व सदाबहार गाण्यावरील नृत्याने उपस्थिताची मने जिंकली. तर कारखान्याचे गोडाऊन किपर पवार साहेब यांनी गायलेल्या गीतांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले.
मंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव, उपाध्यक्ष भगवान पोवार खजिनदार तानाजी कदम सचिव पांडुरंग कुंभार आणि गणेशोत्सव मंडळ कार्यकारी समितीचे सर्व सदस्यांनी केलेल्या नेटक्या संयोजनाची सर्वांनी वाहवा केली.
छाया :- सचिन पाटील













