Thu, Jan 15, 2026
अध्यात्म पर्यावरण

‘किसन वीर’च्या एनसीसी छात्रांचा उपक्रम स्तुत्य : अमोल गवळी

‘किसन वीर’च्या एनसीसी छात्रांचा उपक्रम स्तुत्य : अमोल गवळी
Ashok Ithape
  • PublishedSeptember 13, 2024

वाई येथे पर्यावरण रक्षणासाठी गणेशमूर्ती विसर्जनाचा अनोखा उपक्रम

वाई / प्रतिनिधि – वाई शहर व परिसरातील काही घरगुती गणपती व गौरी विसर्जनानिमित्त सर्व मूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्याऐवजी एकत्रितरित्या स्वीकारून त्या नगरपालिकेकडे सुपूर्द करण्याचा उपक्रम येथील किसनवीर महाविद्यालयातील एनसीसी छात्रांतर्फे राबवण्यात आला. पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने हा स्तुत्य आहे. सर्वांनीच त्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन वाई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी केले आहे.

वाईतील किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्याऐवजी त्या विद्यार्थ्यांकडे एकत्रितरित्या देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गौरी विसर्जना वेळी विसर्जित करण्यात येत असलेल्या घरगुती गणेश मूर्तींची स्वीकृती एनसीसी छात्रांकडे करण्यात आली. कृष्णा नदीपात्रालगत घाटावर आयोजित या उपक्रमास वाईतील गणेश भक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यावेळी श्री. अमोल गवळी यांनी महाविद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.

विसर्जनानिमित्त नदीपात्रालगतच्या सर्वच घाटांवर आलेल्या सर्व गणेशभक्तांना किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना युनिटच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सर्वच घाटांवर उपस्थित राहून पर्यावरणाच्या रक्षणासाठी निर्माल्य तसेच गणेश मूर्ती एकत्र करून त्या वाई नगरपालिकेकडे स्वाधीन करीत असल्याची माहिती दिली.
त्यावेळी सर्व वाईकरांनी गणेश मूर्ती आणि निर्माल्य एनसीसी छात्रांकडे सुपूर्द करून पर्यावरण हितासाठी सामाजिक बांधिलकी जपली.

एनसीसी युनिटचे प्रमुख कॅप्टन डॉ. समीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 90 छात्रांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले. या मोहिमेच्या समारोप प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी या उपक्रमाबाबत महाविद्यालय व छात्रसैनिकांची स्तुती करून या उपक्रमाचे महत्व विषद केले.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी पर्यवारणाप्रति संवेदनशीलता व्यक्त करून भाविष्यात असेच समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यासाठी एनसीसी युनिटला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मनोगत व्यक्त केले.

या वेळी वाईतील जेष्ट पत्रकार भद्रेश भाटे, यांच्यासह वाईतील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे संयोजन कॅप्टन डॉ. समिर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव चौधरी, रविराज राजपुरे, श्वेता धनावडे, अमृता पवार आणि मोनिका मोझर यांनी यशस्विनीपणे पार पाडले.
सर्व स्तरातून या उपक्रमाबद्दल महाविद्यालय व छात्रसैनिकांचे कौतुक करण्यात येत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!