Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

पर्यावरणस्नेही गणपती बाप्पाची रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी..

पर्यावरणस्नेही गणपती बाप्पाची रांगोळी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी..
Ashok Ithape
  • PublishedSeptember 12, 2024

सौ. कोमल जाधव यांच्या कलात्मकतेचे कौतुक

भुईंज :- अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता:।मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर ।।’अर्थात, कुंकवाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्वरा, त्यांचा स्वीकार कर, अशी प्रार्थना करून देवपूजेला प्रारंभ करणाऱ्या हिंदू धर्मशास्त्रात या तांदळाच्या अक्षतांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याच अनन्यसाधारण महत्त्वातून धर्मशास्त्रानुसार श्रद्धा अबाधित राखत असतानाच, त्याच अक्षतांचा म्हणजेच तांदळाचा व कडधान्यचा वापर करून पर्यावरणस्नेही गणपती बाप्पाची रांगोळी साकारून पर्यावरण संवर्धनाच्या आधुनिक विचाराची भक्ती करणारे भुईंज मधील महालक्ष्मी स्वीट्सचे अभिजित व अनिकेत जाधव कुटुंबीय म्हणजे गणेशोत्सवातून पर्यावरणाचा संदेश देणारे पर्यावरणदूतच ठरले आहेत.

जाधव कुटुंबातील थोरल्या सुनबाई सौ. कोमल अभिजित जाधव या उच्चशिक्षित आणि तितक्याच संस्कारीत. “ज्ञानदीप” क्रेडिट को -ऑप. संस्था आणि LIC प्रतिनिधीच्या माध्यमातून प्रामाणिक मेहनत, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर “धनाचा दीप ” सदैव तेवत ठेवणाऱ्या सौ. कोमल जाधव या कुटुंबाची जबाबदारी संभाळीतच सण समारंभाना पारंपरिक पद्धतीने साजरे करितच आधुनिकतेचा बाज देतात.

या गणेश सोहळ्यात सौ. कोमल यांनी गौरी पूजनाला तांदूळ व डाळी तसेच कडधान्याचा वापर करून गणपती बाप्पाची सुंदर व सुबक रेखाटलेली रांगोळी पाहण्यासाठी गणेशभक्त, माहिलावर्गाने आवर्जून हजेरी लावत सौ. कोमल यांच्या कलात्मकतेचे कौतुक केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!