Mon, Mar 2, 2026
शिक्षण

सौ.निलम खंडाईत यांना कराड पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सौ.निलम खंडाईत यांना कराड पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
Ashok Ithape
  • PublishedSeptember 5, 2024

 गौरव कर्तृत्वाचा

कराड l जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंबर, तालुका कराड येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. निलम अमोल खंडाईत यांना पंचायत समिती कराड यांचा मानाचा समजला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती कराड यांच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो.

सौ. निलम खंडाईत यांनी आपल्या सेवेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.

शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत मिळविलेले सुयश, स्काऊट
गाईड चळवळीत उल्लेखनीय कार्य आदी शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना पंचायत समिती कराड यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!