Mon, Mar 2, 2026
शिक्षण

महाबळेश्वर तालुकास्तरीय माहिती व नोंदणी कार्यशाळा उत्साहात संपन्न.

महाबळेश्वर तालुकास्तरीय माहिती व नोंदणी कार्यशाळा उत्साहात संपन्न.
Ashok Ithape
  • PublishedSeptember 4, 2024

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर आणि सातारा भारत स्काऊट आणि गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 03/09/2024 रोजी महाबळेश्वर तालुकास्तरीय माहिती व पथक नोंदणी कार्यशाळा जिल्हा परिषद शाळा, मेटगुताड येथे संपन्न झाली.*

या कार्यशाळेस तालुक्यातील एकूण 69 शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

या कार्यशाळेत पथक नोंदणी, शिक्षक प्रशिक्षण, मेळावे, गणवेश, अभ्यासक्रम, सध्या चालू असणाऱ्या शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने राबवायचे उपक्रम इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महाबळेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. आनंद पळसे साहेब,केंद्रप्रमुख यांनी या कार्यशाळेस भेट देऊन मार्गदर्शन केले.विशेष शिक्षक श्रीनिधी जोशी मॅडम,शाळेचे मुख्याध्यापक शेलार सर यांच्या सहकार्याने सदर कार्यशाळा यशस्वी झाली.

सातारा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयातील जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (स्काऊट)सुरेंद्र शिंदे, ज्येष्ठ लिडर ट्रेनर रंजना शिंदे,ज्येष्ठ स्काऊटर सुभाष कुंभार,जिल्हा संघटक स्काऊट बाळासाहेब राठोड,जिल्हा संघटक गाईड सविता भोळे यांनी कार्य केले.

जिल्हा मुख्य आयुक्त मा.शबनम मुजावर मॅडम, जिल्हा आयुक्त गाईड मा. प्रभावती कोळेकर मॅडम, जिल्हा चिटणीस मा. रविंद्र खंदारे सर यांनी या कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!